श्रावणात मांसाहार यासाठी केल्या जात नाही. जाणून घ्या यामागची शास्त्रीय कारणे.

श्रावण महिना म्हटलं की मांसाहार करण्यास बंदी घातली जाते. पण नेमकी या मागील कारणे जरा वेगळीच आहेत. खरंतर भगवान शंकराच्या पूजेसाठी सावन महिना सर्वोच्च मानला जातो. यावर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरु होईल आणि २७ ऑगस्टला समाप्त होईल. दरम्यान १ तारखेला श्रावणातील पहिला सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार ८ ऑगस्ट, तिसरा १५ ऑगस्ट, आणि चौथा श्रावणी सोमवार २२ ऑगस्टला असेल. या चार श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यात येतात. तमाम श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांकडून या पवित्र श्रावण महिन्यात विधिवत पूजाअर्चा केली जाते.

 

यातील महत्वाची बाब म्हणजे या पवित्र श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. तसेच घरातील वडीलधारी मंडळी श्रावणात मांसाहार न करण्याचा सल्ला देतात आणि आपणही ते कोणताही युक्तिवाद न करता पाळतो. मात्र श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे धार्मिक तसेच शास्त्रीय कारणे देखील आहेत. आज आपण जाणून घेऊया, श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावे आणि यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होत असतो.

 

हवामानाचा पचनशक्तीवर परीणाम

 

पावसामुळे हवामानात आर्द्रता असते, त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो आणि ती कमजोर होते. शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो. पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे मांसाहार आतड्यांमध्ये सडायला लागतो आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

 

या काळात अन्नपदार्थ लवकर खराब होतात 

 

श्रावण महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे वातावरणात बुरशी आणि त्याचे संक्रमण वाढू लागते. पावसाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम मांसाहारावर होतो. सूर्यप्रकाशाची कमतरता आणि आर्द्रता यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात.

 

या काळात प्राण्यांची प्रतीकार शक्ती कमी असते.

 

पावसाळ्यात कीटकांची संख्या वाढते, त्यामुळे अनेक आजार होतात. प्राणी अनेकदा तृणधान्य खातात आणि पावसाळ्यात ते अनेक प्रकारचे कीटक देखील खातात, ज्यामुळे ते आजारी पडतात आणि मांसाहारी अन्न खाल्ल्याने हा संसर्ग मनुष्यापर्यंत पोहोचू शकतो.

 

पावसाळ्यात मासे अंडी देत असतात.

 

पावसाळ्यात सीफूड खाणे देखील हानिकारक असू शकते, कारण यावेळी मासे अंडी घालतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यावेळी सीफूड खाणे योग्य नाही, कारण त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

 

या काळात पचनास हलका आहार घ्यावा

 

पावसाळ्यात उशिरा पचणारे अन्न खाऊ नये. नये, कारण पोटात अन्न लवकर पचले नाही तर ते आतड्यांमध्ये सडायला लागते आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मांसाहार पचायला जड असतो, त्यामुळे या ऋतूत जलद पचणारे अन्न खाण्याचा प्रयत्न करावा.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts