ओमायक्रॉन  वेगाने पसरण्याचे  WHO ने सांगितली ३ मोठी कारणे

जगभरात कोरोनाच्या  ओमायक्रॉन या विषाणूमुळे हाहाकार माजलेला आहे भारतात दररोज एक लाखांपेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरणाच्या तिसरी लाट येण्याची भीती देशात पसरलेली आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुकताच  शेअर केलेल्या नवीन आकडेवारीत  असे दिसून आले  की, गेल्या आठवड्याभरात जगात कोरोनाचा  संसर्ग  सुमारे 10 दशलक्ष अशे नवीन प्रकरणे समोर आले आहे.  ज्यात ओमायक्रॉनचे रूग्ण सर्वात जास्त असल्याचे दिसून येतय.  याबाबत डब्ल्यूएचओच्या कोविड-19 च्या तांत्रिक गटाची  प्रमुख मारिया वॅन कारकोव्ह हिनेयाबद्दल  चिंता व्यक्त केली असून, तो कोरणाच्या हा नवा प्रकार किती प्राणघातक आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी  सर्वसामान्य  लोक काय करू शकतात हे सांगितले.

 

कारकोव्ह म्हणाली  की, जगभरात ओमायक्रॉन ने संक्रमित असलेल्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये हॉस्पिटलायझे होण्याचा धोका कमी असला  तरी, मोठ्या संख्येने लोकांना क्लिनिकल केअरची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या वाढत्या रुग्ण  संख्येमुळे रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात दबाव येऊ शकतो.

ओमायक्रॉन हा विषाणू इतक्या मोठ्या वेगाने का पसरत चालले आहे याची प्रमुख ३ करणे समोर आलेले आहे.  

पहिले कारण –

ओमायक्रॉन विषाणू मोठ्या प्रमाणात पासरण्यामागे  पहिले कारण म्हणजे, या विषाणूमध्ये आढळणारे उत्परिवर्तन ते मानवी पेशींना अधिक सहजपणे चिकटतात. 

दुसरे कारण –

 रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे  हे दुसरे मुख्य कारण आहे. ज्या लोकांना कोरोना विरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे किंवा त्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होत आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेऊनही  विकसित झालेली प्रतिकारशक्ती काही काळानंतर कमकुवत होत असताना दिसत  आहे. त्यामुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे हे दुसरे मुख्य कारण असू शकते. 

तिसरे कारण –

कारकोव्ह हिने  स्पष्टपणे नमूद केले की ओमायक्रॉन इ सहजपणे पसरण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे डेल्टा आणि कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार वरच्या श्वसनमार्गामध्ये हल्ला करून घर बसवतो  तर उर्वरित रूपे फुफ्फुसावर आणि खालच्या श्वसनमार्गावर हल्ला करतात. 

इतर करणे – 

सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न घालणे इत्यादी नियमांचे पालन होत नसल्यानेही या विषाणूचा प्रसार होत आहे.

डेल्टा आणि डेल्टा प्लस या प्रकारच्या आवृत्तीच्या तुलनेत ओमायक्रॉन पासून गंभीर रोगाचा धोका होणे हे थोडे कमी आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

या विषाणूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी अशे आव्हान कारकोव्ह हिने केले.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts