स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार का करावे ? जाणून घ्या सत्य!

स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार का करावे ? जाणून घ्या सत्य! 

 

फार फार पूर्वापारपासून चालत असलेले मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अनेक स्त्रिया मनोभावे करतांना दिसतात. श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत पूजा केली जाते. आता बघुया या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी करावी. 

स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार का करावे ?

-अशी करा पूजा

 

लेटेस्ट लीमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून तयार व्हावे. सुवासिनी या दिवशी उपवास करतात. सर्वप्रथम एल पाट मांडावा. त्या पाटावर स्वच्छ कापड अंथरावे. त्यानंतर एक पाण्याचा कलश घ्या. त्यात सुपारी, दूर्वा आणि नाणे टाकावे. कलशासाठी आंब्याची किंवा अशोकाची पाच ते सात पाने वापरावी. या पानांमध्ये नारळ ठेऊन कलश तयार करावा. त्यानंतर कलशावर हळद-कुंकु लावावे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी.  

 

आता पाटावर तांदळाची रस ठेवा आणि त्यावर तयार केलेला कलश ठेवा. कलशाची पूजा त्याला फुले आणि अक्षता अर्पण करा. कलशावर ठेवलेल्या नारळाला फुले आणि अक्षता अर्पण करा. यानंतर पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावा आणि फुलांनी सजवा. नंतर देवीसमोर गोडाचा प्रसाद, मिठाई, खीर आणि फळे अर्पणकरा. सोबतच नैवेद्य दाखवा दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करा आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका. जमल्यास महालक्ष्मी नमन अष्टक पठण करा आणि शेवटी आरती करा. ही पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून पुन्हा पूजा करा. आणि देवीला नमन करून त्या पाच डहाळ्या घराच्या चारही कोपर्यात ठेवा.

 

मार्गशीर्षचे गुरुवार का महत्वाचे आहे ?

 

पूर्वापार चालत आलेल्या या मर्गाशिष महिन्यातील गुरुवारला फार महत्त्व आहे. खरंतर, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.यादिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते, अशीही मान्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते. त्यामुळे अनेक स्त्रिया हे गुरुवार करताना दिसतात. भाविकांनी हे गुरुवार मोठ्या श्रद्धेने केल्याने याचे लाभ मात्र नक्की मिळतात असे भाविकांचे म्हणणे आहे. 

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts