भगवान विश्वकर्मा यांची पुजा का केली जाते ? मुळात कोण होते भगवान विश्वकर्मा ? जाणून घ्या पौराणिक कथेनुसार रोचक माहिती.

आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती. खरंतर मत्सपुराण चर्चेनुसार वास्तुशास्त्र विद्येचे देवता भगवान विश्वकर्मा मानले जातात. तसेच या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार देखील मानले जातात. चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वास्तूंचे दाखले आहेत. त्यांनी कृष्णाची द्वारका, पांडवांची मयसभा, देवी देवतांसाठी आलिशान महाल, स्वर्गलोक, लंका, हस्तिनापूर, इंद्रपुरी, जगन्नाथ पुरी वसवली. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील  कृष्ण, सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ,  भगवान विष्णूंसाठी कवच कुंडल, महारथी कर्ण साठी कवच कुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती.  त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे. त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तूदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते. 

 

धर्मशास्त्रानुसार माघ शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो. तसेच त्यांच्या आशीर्वादाने काम व्हावे, यासाठी कार्यालयात विश्वकर्मा यांची तसबीरही आढळते. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या प्रतिमेचे सामूहिकपणे साग्रसंगीत पूजन केले जाते. यादिवशी अवजारांची, शस्त्रांची पूजा केली जाते. अभिषेक घातला जातो आणि भक्तिभावे विश्वकर्मा यांचा आशीर्वाद घेतला जातो. 

 

आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. पूजा विधी नेहमीचाच आहे. फक्त त्याला काही मंत्रांची जोड द्यावी. जसे की, ॐ आधार शक्तपे नमः , ॐ कूमयि नमः, ॐ अनंतम नमः, ॐ पृथिव्यै नमः। या मंत्रांचे उच्चारण करून मनःपूर्वक नमस्कार करावा आणि या सृष्टीचे त्यांनी सदैव पालन आणि रक्षण करावे, म्हणून प्रार्थना करावी. 

 

विश्वकर्मा पूजेचे महत्त्व

 

असे म्हटले जाते की भगवान विश्वकर्मा यांनी देवांसाठी शस्त्रे, शस्त्रे, इमारती आणि मंदिरे बांधली होती. विश्वकर्मा हे वास्तुशास्त्र विद्येतील जाणकार महात्मा होते. विश्वाच्या निर्मितीमध्ये विश्वकर्माने भगवान ब्रह्माला सहकार्य केले होते. असे म्हटले जाते की भगवान विश्वकर्माची पूजा केल्याने घरातील वास्तुदोष नष्ट होण्यास मदत होते. आणि घरी शांतता नांदण्यासाठी विश्वकर्मा पूजा अवश्य करावी.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts