निरलज्ज पणाची पण हद्द असते पण या प्रकरणात अगदी महिलेने पोलिसांशी चक्क मास्क न घातल्यामुळे हुज्जत घातली. पोलिस आणि आरोग्य कर्मचारी अगदी जीवाचे रान करून सामान्य जनतेची काळजी आणि प्रशासकीय व्यवस्था सांभाळत कोरोना परिस्थिती सांभाळत आहेत. काही पोलिस आणि डॉक्टरांना अश्याच समाज कंटकांकडून असाच प्रशासनाला त्रास देण्याचे अनेक प्रकार समोर आलेच आहेत.
काय आहे प्रकरण:
तसाच हा प्रकार दिल्लीत घडून आला आहे. दिल्लीत कार मध्ये मास्क घालने बंधनकारक करण्यात आले आहे. पण हे जोडपं मास्क न लावता वाहन चालवताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून समज देण्याचा प्रयत्न केला आणि २५० रुपये नियमा प्रमाणे दंड अकरावा लागेल असे सांगितले. भर रस्त्यावर पोलिसांनी अशी अडवणूक केली म्हणून ही महिला पोलिसां सोबत मग हुज्जत घालू लागली. त्यात तिने रस्त्यावरील काही नागरिकांनी कसा मास्क नाही घातला तुम्ही त्यांना का बर असे अडवत नाही असे विचारून त्यांना धमक्या देऊ लागली. तुम्ही पोलीस असेच त्रास देतात आणि खूप काही कोणालाही न घाबरता तिचा हा उद्धटपणा सुरूच होता. पण तिच्या पतीने समजदरीची बाजू ही घेतली नाही, चक्क या महिलेचा पती ढिम्मच होणाऱ्या या सर्व प्रकाराकडे पाहतच राहिला.
अनेक मिनिटे पोलिसांचा वेळ वाया घालवून या महिलेने सुरक्षा व कायद्यात अडथळा आणला. यामुळे तिची रवानगी थेट कोथळीत करण्यात आली आहे. दिल्ली येथील दर्या गंज पोलीस ठाणे येथे, यु/ यस १८८/३४ आणि ५१ डी.डी.यम, या कलमा द्वारे एफ.आय.आर करण्यात आली असून. महिलेचा पती आता वकील आणि पोलीस यांच्याशी वाटाघाटी करीत आहे.
पोलिस हे आपले प्राण हातावर घेऊन सध्या ओव्हर टाईम काम करत आहेत त्यातच काही लोकांच्या अश्या वागण्याने त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. तर लोकांनो काळजी घ्या आणि पोलीस हा सुद्धा माणूसच असून त्यालाही सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे हाताळायची आहे यावर लक्ष असू द्या. त्यांच्या शी हुज्जत घालण्ापेक्षा आपण च कायद्याचे पालन करा.