कार्ल बेंझची पत्नीच्या माहेरी जाण्यामुळे झाली आधुनिक वाहनांची निर्मिती – वाचा सविस्तर वृत्तांत !

समजा जर एका स्त्रीने  एकटीने काही शहरांमधून प्रवास केला,तर समजाचा नक्कीच विश्वास बसेल आणि तेसुद्धा हे स्वयंचलित वाहन विकत घेतील, असे बर्थाला वाटायचे.

२९ जानेवारी १८८६ जागतिक स्वयंचलित वाहन दिवस म्हटलं जातो. २९ जानेवारी १८८६ या दिवशी नेऋत्य दिशेच्या जर्मनीतील मॅन्हाईम (Mannheim) शहरातले प्रसिद्ध उद्योजक व अभियंता  कार्ल बेंझ यांना त्यांच्या नवीन अविष्कार आधुनिक वाहनाचे पेटंट मिळाले होते. म्हणजेच २९ जानेवारी १८८६ रोजी गाडीची निर्मिती झाली होती.

 

तत्कालीन विश्वात फक्त बैलबंडी , घोडागाडी , टांगाच होत्या. म्हणून इथे “स्वयंचलित वाहन” हा शब्द महत्त्वाचा ठरतो. कार्ल बेंझ यांचे स्वयंचलित वाहन बघायला आणि चालवायला साधेसुधेंच होते.ते दिसायला एक आसनी, लाकडी फ्रेम, लाकडी चाकं टांग्यासारखेच होते. पण त्याच्या पुढे वाहन ओढणारे गाय,बैलं,घोडे नव्हते. पण मागे  धूर सोडणारे,आवाज करणारे दोन हॉर्सपावरचं इंजिन होते.


२९ जानेवारीच्या नंतर लगेच हे वाहन जगाभऱ्यात धावतांना दिसू शकले नाही. हे वाहन आत्ताच लोकांच्या उपयोगासाठी योग्य नाही आणि ती कुठल्याही रस्त्यावर सुरक्षित नाही असे बेंझ यांना वाटायचे. तत्कालीन रस्तेही पण या वाहण्यासाठी योग्य नव्हते. रस्ते फक्त दगड मातीचे, मुरूम मातीचे म्हणजेच खडतर रस्ते होते. त्यामुळे कार्ल बेंझ संशोधनासाठी बऱ्यापैकी आपला वेळ घेत होते. पण हे बघून कार्ल ची पत्नी बर्था बेंझ अस्वस्थ व्हायची. कारण  त्यांच्या लग्नात आलेला हुंडा तिने तिच्या पतीच्या व्यवसायात घातला होता,तिजा आपल्या पाटीवर विश्वास नसल्यामुळे तिची जरा चिडचिड होत होती.

बघता बघता दोन वर्ष संशोधनात असेच निघून गेले. आणि नंतर एके दिवशी कार्ल काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, बर्थाने ठरवले “ही गाडी अगदी सुरक्षित आहे, ती लांबवर नथांबता चालू शकते,” हे सिद्ध करण्याचे ठरवले. यासाठी ती हे वाहन बाहेर काढायची.  समजा जर एका महिलेने काही शहरांमधून प्रवास केला,तर समजात राहणाऱ्या लोकांचा नक्कीच विश्वास बसेल आणि तेसुद्धा हे स्वयंचलित वाहन विकत घेतील, असे बर्थाला वाटायचे.

 

बर्था तिच्या दोन मुलांना घेऊन स्वतःच त्या ड्राईव्हवर निघाली.

 

पहिल्या ‘मोटरवॅगन’च  पेटंट कार्ल बेंझ यांना मिळाले होते,त्याचीच सुधारित आवृत्ती ‘मोटरवॅगन-३’ त्यांच्या गॅरेजमध्ये होती. बर्थानेआपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या माहेरी  फॉर्झएमला (Pforzheim) जाण्याचे तीने ठरविले .मॅन्हम ते माहेर फॉर्झएम आणि परत असा एक मार्ग तिने निश्चित केला. या गोल फेरीचे अंतर एकूण १९४ किलोमीटर होते. त्याकाळी रस्ते सुद्धा चांगले नव्हते नाही रस्त्यांवर साईनबोर्ड किंवा गुगल मॅप्स. बर्थाला तिच्या माहेरी जाण्याचा मार्ग फक्त एका नदी आणि वाटेत असलेल्या रेल्वे रुळांमुळे थोडाफार माहित होता.रस्त्यात काही गावंही होतीच.

मोटरवॅगन-3 सुद्धा  साधेसोपे आणि चालवायला अवघड होते. लाकडी फ्रेम, लाकडी चाकांचा एक आसनी टांगा, ज्यामागे एक धूर सोडणारं तो फोरस्ट्रोक इंजिन लागलेले . ज्याला चालू करायला एक खूप मोठे चाक फिरवावे लागायचे त्याचेच अद्ययावत रूप म्हणजे आपण आज गाड्यांना जी किक मारतो ती, किंवा आता तर सेल्फ स्टार्ट आलंय ते.



बेंझ ती या गाडीवर बसली आणि तिच्या दोन मुलांनी सुरुवातीला ते चाक फिरवून गाडी सुरू करून दिली. मग सुरू झाला हा खडतर प्रवास. ना धड रस्ते, ना गाडीला कुठले शॉकअप आणि सगळे लाकडीच  आणि सीटबेल्टच्या जन्माला अजून शंभर वर्षाची कालावधी होता . त्यामुळे भलेही हा प्रवास बर्थाच्या माहेरीच तरीपण काही आनंदाचा नव्हता. रस्त्यात कोणी तिच्या या गाडीकडेबघून भरून जायचे,कुणाचा विश्वासच बसायचा नाही तर कुणी काही काळापर्यंत याला जादू समजायचे.

 

बर्था यांची नात जुट्टा बेंझ पेटंट केलेली मोटरवॅगन-3 चालवताना

१५० वर्षांपूर्वीचा हा अविष्कार तितकाच क्रांतिकारी होता, जितका भारतात सावित्रीबाई फुलेंची शिक्षणासाठीची धडपड.शेवटी बर्था फॉर्झएमला पोहोचली, माहेरी काही काळ विसावली आणि परतीचा प्रवास त्याच वाटेवरून सुरू केला.

पातिला नकळत  तिने केलेला हा प्रवास आज मानवजातीसाठी अक्षरशः आश्चर्यजनक गोष्ट ठरली. कार्ल बेंझ स्वगृही परतले तेव्हा त्यांना यावर आधी विश्वास बसला नाही. मात्र तोवर त्यांचा हा अविष्कार त्यांच्या गॅरेज आणि पेटंट ऑफीसपलीकडे पोहोचला होता आणि आता त्यांच्या ‘मोटरवॅगन’ची चर्चा पंचक्रोशीत होत होती.

बर्था यांच्या एका धाडसी निर्णयामुळे जर्मनीचं नाव जगाच्या पाठीवर वाहनांची राजधानी म्हणून नोंदवलं गेलं.

गाडीचा हा शोध एकट्या कार्लनी नाही लावला , ही कार्ल आणि बर्था यांची टीम होती.खरंतर बर्था यांच्याच त्या धाडसी निर्णयामुळे आज जर्मनीचं नाव जागतिक वाहन उद्योगात अग्रस्थानी आहे. आज पण जगातले वेगवान आणि तीव्र गतीने चालणारे वाहन आणि आलिशान ब्रॅँड्स जर्मनीचे आहेत.तसेच इलेक्ट्रिकल वाहनाच्या क्रांतीतही जगाच्या नजरेत जर्मनी अग्रेसर आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts