सुमारे 5000 वर्षांपूर्वीची जगातली सर्वात जुना बिअर कारखाना इजिप्तमधल्या पुरातत्तवशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
इजिप्त आणि अमेरिकेचे प्राचिन तत्वशास्त्रञा संशोधक पथकाने ऍबिडोस च्या वाळवंटातल्या स्मशानात ही ब्रुअरी सापडली आहे.बिअर तयार करण्यासाठी धान्य आणि मिश्रण उकळून वापरण्यात येणारी ४० मडकी असलेली युनिट्स त्यांना सापडले आहेत.
सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजच्या माहितीनुसार,ही ब्रुअरी त्याकाळच्या इजिप्तमधल्या नार्मर राजाच्या काळातली असू शकते. ‘ही जगातली सगळ्यात जुनी, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी ब्रुअरी’ असल्याचे त्यांनी म्हटले .
सुमारे 5000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये नार्मर राजाची तिथे राजवट होती. तत्कालीन ईजिप्तवर राजकरणारे आणि इजिप्तला एकत्र आणणारे हे पहिलले साम्राज्य होते असे मानले जाते.
ही ब्रुअरी इजिप्तमध्ये २० मीटर म्हणजे ६५ फूट च्या आठ भागांमध्ये विभागण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येकाला दोन ओळींनी मांडून ठेवण्यात आलेली मातीची ४० मडकी असल्याचे इजिप्तच्या सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजचे जनरल सेक्रेटरी मोस्तफा वझीरी यांनी सांगितले.
त्यावेळेस बिअर तयार कारण्यासाठी मोठ्या पिपांमध्ये धान्य आणि पाण्याचे मिश्रण उकळले जात होते. मातीच्या रिंगच्या आकाराच्या कड्यांच्या मदतीने हे पिपें एकाजागी घट्ट अडकवून ठेवले जात होते. पुरातत्त्व संशोधक आणि या मोहिमेचे प्रमुख असणाऱ्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या मॅथ्यू ऍडम्स यांच्या सांगण्यानुसार “इजिप्तच्या राजांसाठी बांधण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांच्या जागी होणाऱ्या प्रथा आणि सोपस्कारांसाठी पुरवठा करायला म्हणून ही ब्रुअरी या जागी बांधण्यात आल्याची शक्यता आहे,” असे इजिप्तच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे.
या बिअर कारखान्यामध्ये त्या काळी एकावेळी सुमारे २२,४०० लीटर बिअरचे उत्पादन होत असल्याचा अंदाज आहे. “बिअरचा वापर बळीच्या प्रथेमध्ये करण्यात येत असल्याचे पुरावे या ठिकाणच्या खोदकामात सापडले आहेत,” असे म्हणतात.
इजिप्तमधील ऍबिडोस हे पुरातन शहरांपैकी एक असून इथे मोठ्या दफनभूमी आणि देवळे आहेत. इजिप्तच्या उत्तरेला सोहाग प्रांताच्या दक्षिणेकडे हा भाग आहे. लक्सर (Luxor) हे इजिप्तमधले प्रसिद्ध पर्यटनस्थळही याच भागात आहे.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अलेक्झांड्रिया परिसराजवळ खोदकाम करत्यांना सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या ममीज सापडल्या होत्या.या मुंमीजच्या तोंडातल्या जीभा सोन्याच्या आहेत.