दररोज देशात एक हजारांहून कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही फेस मास्क वापरणं आवश्यक आहे.जाणून घ्या कोरोनाचा XE प्रकार काय आहे? तो किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत.
XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. मुंबईतील दक्षिण आफ्रिकन वंशाच्या एका महिलेला XE व्हेरियंटची लागण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आला आहे. तर, वैज्ञानिकांना अद्याप याविषयी कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्यामुळं केंद्रानं मुंबई महापालिकेचा हा दावा फेटाळला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट XE ची पहिली केस ब्रिटनमध्ये आढळून आली आहे.
कोरोनाच्या XE प्रकाराचा भारतात डेल्टासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही, पण काळजी घ्यावी!
भारतातील बहुतेक लोकांचं कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. नवीन प्रकारासंबंधीच्या प्राथमिक माहितीच्या आधारे, असे म्हटले जात आहे की ते इतर प्रकारांपेक्षा 10% जास्त संसर्गजन्य आहे. म्हणजेच त्याचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. अजूनही XE प्रकाराचा बारकाईने अभ्यास करत आहोत आणि अधिक माहिती घेत आहोत. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. कारण यामुळं रुग्ण जास्त गंभीर होत नाही. ज्यांचं लसीकरण करण्यात आले आहे त्यांना सुरुवातीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत, असं स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं आहे.
XE व्हेरियंटची लागण झाली ही कशी ओळखाल?
XE व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये नाक वाहनं, शिंका येणं आणि घशात खवखव होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. जे विषाणूच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळे आहेत. कारण मूळ स्ट्रेनमध्ये रुग्णात ताप आणि खोकला यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच, या व्हेरियंटमध्येही इतर व्हेरियंटप्रमाणे चव लागत नाही. तसेच, कोणताही गंध येत नाही. अश्याच अरोग्यासंबंधी माहीत साठी आमच्या मराठी shout, Instagram आणि Facebook अकाउंट्स ला लगेच फॉलो करा आणि निरोगी राहा.
भारतीयांना XE व्हेरियंट देईल काहो त्रास?
WHO ने म्हटलं आहे की, नवीन म्यूटेंट Omicron च्या ba.2 सब-व्हेरियंटपेक्षा सुमारे 10 टक्के अधिक संक्रमणक्षम आहे. जे कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेनपेक्षा जास्त संक्रमणीय असू शकतं. कोरोना व्हेरियंटच्या नव्या व्हेरियंटमुळे आरोग्य वर्तुळात चिंता वाढली आहे. कारण महाराष्ट्र सध्या रिकव्हरी ट्रॅकवर आहे आणि डिसेंबर 2021 मध्ये सुरू झालेली राज्यातील तिसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. जरी सध्या जगभरात XE चे काही रुग्ण आढळून आले आहेत.