इंटरनेटमध्ये क्रांती घडून आल्यानंतर आता भारतात सुपरफास्ट 5G सेवा लॉन्च होणार आहे. मात्र, ही सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला होती. आता ती प्रतीक्षा संपली आहे.
Image - Getty Images
12 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
Image - Getty Images
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या – ” पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरात 5G सेवा पोहचण्याचे आमचं ध्येय आहे. "
Image - Getty Images
" 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असावी , याची खात्री करु व त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष दिल्या जाईल ”
Image - Getty Images
High-speed 5G internet सेवा दोन-तीन वर्षांत देशातील बहुतेक भागांमध्ये उपलब्ध होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या मंडळांमध्ये नेटवर्कचे स्थिर रोलआउट होण्याचे अपेक्षित आहे.
Image - Getty Images
DoT ने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरु होईल.
Image - Getty Images