श्रीलंकेने साखळी सामन्यातील पराभवाचा बदला सुपर ४ मध्ये घेत अफगाणिस्तान वर ४ विकेटने विजय मिळवला.
आशिया कप २०२२ मधील आज पासून सुरु झालेल्या सुपर ४ मधील श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान च्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी चा निर्णयघेतला.
अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करत १७५ /५ चे लक्ष उभे केले. अफगाणिस्थान कडून गुरबाझने ८४ धावा तर इब्राहिम ने ४० धावा केल्या.
विजयासाठी मिळालेल्या १७६ धावसंख्येचा पाठलाग करताना निसाकाने ३५ धावा,मेंडिसने ३६ धावा, गुणातिल्काने ३३,तर वादळी खेळी करत राजापेक्षाने ३१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तान कडून मुजीब रहमान ने २ ,नवीन हअक़ ने २ तर राशिद खान ने १ विकेट घेतल्या.
आशिया कप २०२२ मधील साखळी सामन्यातील पराभवाचा वचपा श्रीलंके ने काढत अफगाणिस्तान वर ४ विकेट्स ने विजय मिळवला.
श्रीलंकेने मागील दोन सामन्यात दमदार कामगिरी करत विजय प्राप्त केला आहे. या सामन्यात सामनावीर गुरबाझ ठरला.
आशिया कप २०२२ सुपर ४ मध्ये पुढील श्रीलंकेची मॅच भारत सोबत ६ सप्टेंबरला तर अफगाणिस्तान ७ सप्टेंबरला पाकिस्तानशी भिडणार