मोबाईलसकट सिम कार्ड हरवलाय ? तर मग असे करा सिम ब्लॉक !

आपल्या नावाने कोणी सिम कार्ड चालवत तर नाहीये ना ? हा प्रश्न अनेक जणांना कित्येकदा पडला असेल. अनेकदा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंटची गरज असते.

बरेचदा आपल्याला असे वाटते की आपल्या नावावर दुसरे सिम कार्ड कोणी वापर करत नाही ना ? आता असे वाटले तर काळजी करण्याचं काम नाहीये. कारण तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या नावावर किती सिम कार्ड एक्टिव आहेत ते माहिती करु शकतात.

तसेच काहीवेळेस मोबाईल फोन हरवल्यानंतर नवीन सिम मिळते. ते जुन्या सिमची काळजी घेत नाहीत. जर तुमचे जुने सिम तुमच्या card आधार क्रमांकाशी लिंक झाले असेल आणि त्यातून काही गैरप्रकार घडत असतील तर तुमच्या आधार लिंकमुळे तुम्ही पोलिसांच्या चौकशीत किंवा तपासातही येऊ शकताय.

म्हणूनच तुमच्या आधारशी किती मोबाईल सिम लिंक आहेत हे एकदा तपासणे आणि तुम्ही वापरत नसलेले सिम बंद करणे महत्त्वाचे आहे.

असे करा सिम ब्लॉक

Arrow

1. सर्वात आधी (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) या पोर्टलवर लॉगिन करा.

3. आता तुम्हाला सक्रिय कनेक्शनची माहिती दिसेल.

5. Request केल्यानंतर, विभागाकडून एक तिकीट आयडी पाठवला जाईल जेणेकरून तुम्ही त्याचा मागोवा घेऊ शकता. त्यानंतर तुमचा हा नंबर काही आठवड्यात बंद होईल.

तर अश्याप्रकारे तुम्ही ही प्रक्रिया फॉलो केल्यास तुमच्या नावावर किती सिम रजिस्टर आहेत आणि किती सिमकार्ड तुम्हाला माहीत नाहीत हे तुम्ही सहज शोधू शकता.

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.