फ्लाईट मोड हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे. हा पर्याय 99 टक्के काम करेल. फोन थोड्या वेळ फ्लाईट मोड मध्ये ठेऊन परत सुरू केल्याने तुम्हाला एक चांगले नेटवर्क मिळेल.
फोन रीस्टार्ट करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. संगणकाप्रमाणेच, तुम्ही स्मार्टफोन रीस्टार्ट करून नेटवर्क समस्येचे निराकरण करू शकता
सिम कार्ड काढणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्या फोनला चांगले नेटवर्क मिळत नसेल, तर तुम्हाला स्मार्टफोनमधून सिम कार्ड काढून तो परत घालावा लागेल.
काहीवेळा तुम्हाला चांगल्या नेटवर्कसाठी सेटिंग बदलावी लागेल. तुम्ही Android वापरकर्ता असल्यास, तुम्हाला Settings > General > Reset > Reset Network Settings वर जावे लागेल. हे केल्यानंतर तुमचा फोन रीसेट करा.