नोकिया ने  Nokia G11 Plus हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे . 

Nokia G11 हा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला. याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात कंपनी यशस्वी झाली. आता कंपनीने गुपचूप आपला नवा फोन बाजारात आणला आहे, ज्याचे नाव Nokia G11 Plus आहे.

मॉडेलच्या नावात प्लस जोडले गेले असले तरी, वैशिष्ट्ये आधिच्या मॉडेल प्रमाणेच आहेत. फोनची डिझाईन आणि फीचर्सला चांगलीच पसंती मिळत आहे. Nokia G11 Plus ची किंमत देखील खूप कमी आहे.

Nokia G11 Plus मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. ज्याची स्क्रीन रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. 

 Specifications

आतापर्यंत, कंपनीने कोणता प्रोसेसर डिव्हाइसला पॉवर करत आहे हे उघड केले नाही, परंतु ते 1.6GHz ऑक्टा-कोर Unisoc T606 SoC असू शकते.

 Specifications

Nokia G11 Plus मध्ये मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP दुय्यम लेन्स आहेत. समोर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP स्नॅपर आहे.

नोकिया G11 प्लस कॅमेरा

Nokia G11 Plus आउट ऑफ द बॉक्स Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे.  डिव्हाइसला दोन वर्षांचे OS अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील. यात 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

बॅटरी क्षमता

Nokia G11 Plus दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. चारकोल ग्रे आणि लेक ब्लू, असे नव्या मॉडेलचा रंग आहे. 

Nokia G11 Plus ची भारतात किंमत

कंपनीने फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की त्याची किंमत सुमारे $150 (सुमारे 12 हजार रुपये) असेल आणि लवकरच तो निवडक देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Nokia G11 Plus ची भारतात किंमत

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.