SIM Card एका बाजुनं तिरपं का असतं?

तुम्ही कधी सिम कार्ड निरखून पाहिलंय का? 

SIm Card हा  मोबाईलमधील एक असा महत्त्वाचा घटक, ज्यामुळं आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. 

तुम्ही कधी सिम कार्ड निरखून पाहिलंय का? व्यवस्थित पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, की या सिमकार्डवर काही आकडे असतात आणि त्याची एक बाजू तिरपी असते.

आजच्या घडीला जगभरात असणाऱ्या बऱ्याच टेलिकॉम कंपन्या सिमकार्ड तयार करतात. ज्यांची एक बाजू तिरपी असते. सुरुवातीला सिम कार्ड असे नव्हते. ते सर्व बाजूंनी समसमान दिसत होते. 

ज्यावेळी सिम कार्डचा आकार आयताकृती होता, तेव्हा त्याची सरळ आणि उलट बाजू नेमकी कोणती हे अनेकांनाच लक्षात येईना. अशा वेळी बऱ्याचदा युजर्स उलटं सिम मोबाईलमध्ये टाकत होते. 

मग पुढे असं काय झालं? 

सिम कार्ड सरळ असल्यामुळे  ते बाहेर काढताना नाकी नऊ येऊ लागले. या परिस्थितीत सिम कार्डमध्ये असणारी चिप खराब होण्याचीही दाट शक्यता निर्माण होते.  

परिणामी, टेलिकॉम कंपन्यांनी सिमच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले. ज्याअंतर्गत सिम एका बाजूनं कापलं गेलं. यामुळं मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकणं अगदी सोपं झालं.

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.