पतंजली आयुर्वेद या बाबा रामदेव यांच्या आयुर्विज्ञान संस्थेतील काही डॉक्टर हे कोरोना संक्रमित झाले आहेत.३९ आरोग्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे कर्मचारी व विद्यार्थी पतंजली च्या आचार्य कुलम, योग पीठ आणि योग ग्राम येथे कार्यरत होते असे समजले आहे. कुंभ मेळावा आयोजित करण्यात आल्यामुळे आता हरिद्वार मध्येही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.दोन जुना आखाडा आणि दोन निरंजनी आखाडा येथील साधू ही कोरोनाच्या
१ एप्रिल पासून, १५० लोक कुंभ मेळा सुरू झाल्यापासून आढळले आहेत. अनेक वृध्द साधू ही कोरोना मुळे या जगातून गेले आहेत. त्यातच आता संपूर्ण देशातून असंख्य भाविक ही कुंभ मेळाव्यात सहभागी झाले होते त्यामुळे आता अजून देशात कोरोना रुग्ण वाढतील की काय, असा प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आई आई टी तही कोरोनाचा कहर:
आय .आय .टी रुरकी येथेही कोरोनामुळे २९६ बाधित या महिन्यात आढळून आले आहेत. त्यातच या रविवारी ७१ बधितांची वाढ झाली आहे. संस्थेने आता कोरोनाचे नियम आणखी कडाक केले आहेत.