5G internet in India :
इंटरनेटमध्ये क्रांती घडून आल्यानंतर आता भारतात सुपरफास्ट 5G सेवा लॉन्च होणार आहे. मात्र, ही सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला होती. आता ती प्रतीक्षा संपली आहे.
5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते, मात्र आता याबाबत केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे उत्तर दिले आहे.
12 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तसेच 5G सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्याटप्याने विस्तार करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाल्या – ” पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरात 5G सेवा पोहचण्याचे आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असावी , याची खात्री करु व त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष दिल्या जाईल ”
DoT ने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरु होईल.
High-speed 5G internet सेवा दोन-तीन वर्षांत देशातील बहुतेक भागांमध्ये उपलब्ध होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या मंडळांमध्ये नेटवर्कचे स्थिर रोलआउट होण्याचे अपेक्षित आहे. यापूर्वी, सरकारने म्हटले होते 29 सप्टेंबरपर्यंत देशात 5G कनेक्टिव्हिटी सुरू होईल तर दुसरीकडे एअरटेलने याच महिन्यात त्यांची 5G सेवा करण्याचे आश्वासन दिले होते.