धनुष हा असा दक्षिणेतील सुपर स्टार आहे जो सामान्य माणसाच्या जीवनातील कठीण प्रसंग त्याचे दुःख आपल्या चित्रपटात दाखवतो.त्याचे अनेक चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करून त्यांना सुपरस्टार ही पदवी सुद्धा मिलावली आहे. वाडा चेन्नई, असुरण, मारी, मारी २ , रांझना या सारख्या अनेक चित्रपांमधून त्याने आपले अभिनय कौशल्य चोखपणे बजावले आहे. चित्रपट आता हाऊस फुल होईल असे अनेकांचे म्हणणे आहे.
धनुष चा “करनान” ९ तारखेला प्रदर्शित झाला :
चाहत्यांनी आणि चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला पसंती दाखवली आहे. तामिनाडूमधील चित्रपटगृहात ५०% प्रेक्षक क्षमतेने या चित्रपट प्रदर्शन करण्यात आले. प्रेक्षकांना या चित्रपटाचे गाणेही फार आवडले आहे.
या चित्रपटात धनुष हा तिरुनेलवेली या गावातील तलवार बनविणारा एक युवक असून तो घोडा चालविण्यात ही प्रावीण्य असणारा आहे . चित्रपट हा एका खरया गोष्टी पासून प्रेरीत आहे. चित्रपटात धनुष हा एक योद्धा असून तो गावकऱ्यांना मदत कसा करतो हे दाखविण्यात आले आहे. मागील वर्षी डिसेंबअखेर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते, कोरोना जरी असला तरीही निर्मात्यांनी हा चित्रपट वेळेत पूर्ण केले आहे.या चित्रपटात धनुष सोबत,योगी बाबू, लाल, नटराजन सुब्रमण्यम, रजिषा विजयन, गौरी जी. कृष्णन, आणि लक्ष्मी प्रिया ह्या कलाकारांच्या भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर एक छाप पाडून गेल्या आहेत.
‘तामीलरॉकर्स’ यांनी केला चित्रपट केला ऑनलाईन रिलिज:
यंदाही यांनी हा चित्रपटही रिलिज च्या दिवशीच चोरून रेलीज केला आहे. यामुळे या चित्रपटाचे काही प्रमाणत नुकसान होऊ शकते. वेगवेगळा इंटरनेट वरील साईट्स कडून करण्यात येणाऱ्या या पायरसी च्या कृत्याने मागेही अनेक चित्रपटांचे नुकसान झाले आहे.