यंदाचे वर्ष कोरोनामुळे अस्तव्यस्त असताना आता त्यात १० वी CBSE ची परीक्षा सुद्धा वर्णी लागली आहे. यंदा CBSE ने इयत्ता १० च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता १२ वी च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत असे सांगितले आहे.
इयत्ता १० वी च्या मुलांचा निकाल बहुपर्यायी स्वरूपाने CBSE बोर्डाच्या निर्देशानुसार लावण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. आणि इयत्ता १२ वी च्या मुलांची परीक्षा नंतर, कोरोना परिस्थिती चा आढावा घेऊन १ जून नंतर CBSE बोर्डांच्या निर्देशना नंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात येईल.
भारतातील अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्या मनातला प्रश्न, विद्यार्थी पुढच्या वर्गात कसे जाणार?
घाबरु नका, कारण बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न यांद्वारे विद्यार्थ्यांचे आकलन करून त्यांना गुणदान करण्यात येणार आहेत, असे शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली आहे. बोर्ड विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही हे नक्की.
जर हा नियम विद्यार्थ्यांना मान्य नाही,तर पुढे काय ?
अनेक विद्यार्थ्यांना हा नियम त्यांच्या, अभ्यासाचे पूर्ण मूल्यांकन करणार नाही असे वाटत असेल, तर अश्या विद्यार्थ्यांना घाबरण्याची गरज नाही, कारण अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा, कोरोना परिस्थिती चा आढावा घेऊन घेण्यात येईल.