कलागुण असलेल्या लोकांसाठी लोकप्रिय माध्यम ठरलेल्या टिक टॉक ला पर्याय म्हणून बरेच ऍप्स समोर येत आहे. टिक टॉक ला भारतात बंदी आणल्यानंतर टिक टॉक सारख्या असणारे बरेच ऍप्स गूगल प्ले स्टोअर वर आहेत आणि अवघ्या काही दिवसात त्यांची डाउनलोड ची संख्या सुद्धा वाढताना दिसत आहे.
यातील काही ऍप्स हे दोन दिवसा अगोदर आलेले असूनही त्यांचा युजर्स च्या प्रमाणत अगदी अल्पावधीतच वाढ झाली आहे.या ऍप्स मध्ये अगदी टिक टॉक सारखे फिचर्स आहे ज्यामध्ये आपण 15 सेकंदाचे विडिओ बनवू शकतो आणि फिल्टर लावलेलं विडिओ , लीप सिंकिंग ,एडिटिंग करू शकतो. हे ऍप्स कोणते आहे आणि यात काय काय फिचर्स आहे जाणून घ्या सविस्तरपणे
हे आहेत टिक टॉक प्रमाणे फिचर्स असलेले भारतीय ऍप्स
1. रोपोसो (Roposo)
2.चिंगारी (Chingari)
3.मित्रो(Mitron)
1. रोपोसो (Roposo)
अगदी टिक टॉक सारखे फिचर्स असणारे रोपोसो हे ऍप्स खूप पॉप्युलर होताना दिसत आहे. गुगल प्ले स्टोअर्स वर 4.2 रेटिंग असले हे ऍप्स गुरगाव मधील InMobi pvt ltd. या कंपनीच्या नावाने नोंदींत आहे 50 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.वैशिष्ट्य म्हणजे हे हिंदी,मराठी,बंगाली,गुजराती अश्या वेग वेगळ्या भारतीय भाषांना सपोर्ट करते आणि विडिओ एडिटिंग,कॉलॉब्रशन विडिओ अशे अनेक टिक टॉक सारखे फिचर्स आहेत. रोपोस हे टिक प्रमाणे असलेलं भारतीय ऍप्स च्या यादीत पहिल्या क्रमांकावर असून या ऍप्स ला मोठ्या प्रमाणात लोकांनी पसंत केले आहे.
2.चिंगारी (Chingari)
4.1 रेटिंग असलेलं असलेलं या ऍप्स चे 10 मिलियन पेक्षा अधिक डाउनलोड आहे.या ऍप्स चे वैशिष्ट्ये म्हणजे इथे तुम्हा शॉर्ट विडिओ एडिटिंग शिवाय न्युज- समाचार,आणि गेम झोन अशे अनेक फिचर्स दिले असून हे ऍप्स वेग वेगळ्या भारतीय भाषांना सपोर्ट करते
3.मित्रो (Mitron)
सिम्पल इंटरफेस असलेलं मित्रो या ऍप्स ला लोकांची पसंती मिळत असून प्ले स्टोअर्स वर याला 4.3 ची रेटिंग मिळाली आहे . टिक टॉक सारख्या फिचर्स असणाऱ्या या ऍप्सला 10 मिलियन पेक्षा अधिक उजर्स नि डाउनलोड केले आहे. हे ऍप्स काही दिवसांपूर्वी च प्ले स्टोअर्स वर आले असून याचा डाउनलोड संख्या अगदी वेगाने वाढली आहे.
भारत सरकारने टिक टॉक ला भारतात बंदी आणल्यानंतर छोट्या व्हिडिओ च्या या बाजारपेठेत या भारतीय ऍप्स ना आता मोठया प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. टिक टॉक ची सवय असणाऱ्या लोकांनी आता या ऍप्स कडे आपला कल वाढवलेला दिसत आहे.