कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी त्याचा धोका अजूनही संपलेला नाही. अनेक अभ्यासातून असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणूचा पुढील प्रकार हा प्राण्यांमार्फत पसरू शकतो. त्यामुळे , जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुचवले आहे की कोरोना विषाणू मानवांमध्ये पसरू नये यासाठी आतापासूनच योग्य ती पावले उचलने गरजेचे आहे.
अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की कोरोनाची तिसरी लाट संपताच आणि ओमिक्रॉनचा पसार शांत होताच कोरोना विषाणूने मिंक्स आणि हॅमस्टर्सना संक्रमित केआहे. एवढंच नव्हे तर या व्हायरसने उत्तर अमेरिकेतील जंगली पांढऱ्या शेपटीच्या हरणांना सुद्धा संक्रमित केले आहे. डब्ल्यूएचओच्या कोविड-19 च्या तांत्रिक गटाची प्रमुख मारिया वॅन कारकोव्ह यांनी आपल्या ट्विट करून याबद्दल माहिती व उपाययोजना सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुचवले आहे की कोरोना विषाणू मानवांमध्ये पसरू नये म्हणून आतापासून कशी पावले उचलली जावीत.
मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हटले आहे की “सर्वांनी SARS-CoV-2 चा प्रसार कमी करण्यासाठी आणि प्राणी आणि मानवांमध्ये संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.” हे थांबवण्यासाठी तWHO काही टिप्स दिल्या आहेत ज्याचे पालन करणे आव्यश्यक आहे.
माणसांना प्राण्यांमार्फत विषाणुची लागण होऊ शकते का?
कोरोना व्हायरस आणि प्राणी यांच्यावर झालेलया संशोधनांतून असे लक्षात येते कि, हा व्हायरस काही प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आहे, उदा – कुत्रे आणि मांजरी.मात्र , या प्राण्यांपासून माणसांना संसर्ग होऊ शकतो का याबद्दल मात्र आहे असे ठोस पुरावे नाही किंबहुना अजून पुरेशी माहिती समोर आलेली नाही आणि यावर अजूनही तज्ञांचा अभ्यास सुरु आहे.
मागील काही संशोधनात अशे आढळून आले कि, मिंक प्राण्यांची कातडीला (फर) फार किंमत असते, त्यांची कातडी कमावण्यासाठी अनेक पाश्चात्य देशांमध्ये मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात. जगभरात इतरही ठिकाणी, जिथे मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात अशा ठिकाणहून तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याआधी डेन्मार्क आणि नेदरलँड्समध्ये अश्या प्रकारची घटना घडलेली आहे.
प्राणांच्या संरक्षणाकरिता उपाय :
प्राण्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणे
राष्ट्रीय पशु वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरण यांच्यातील सहकार्य मजबूत करणे हे प्राण्यांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याचे रक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे महत्वाचे आहे. तसेच वन्यजीव किंवा प्राण्यांचा आरोग्यावर लाक्ष दिले गेला पाहिजे आणि त्याकरिता चालना देणे आणि लोकांना त्याबद्दल माहिती पुरवणे आवश्यक आहे . याव्यतिरिक्त SARS-CoV-2 ला संभाव्य संवेदनाक्षम समजल्या जाणार्या वन्य प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी केली जावी. प्राण्यांचा अनुवांशिक सिक्वेंस डेटा सामायिक कराणे गरजेचे आहेSARS-CoV-2 च्या पुष्टी झालेल्या प्राण्यांची प्रकरणे जागतिक प्राणी आरोग्य माहिती प्रणाली (OIE-WAHIS) ला कळवावी.
संक्रमित प्राण्यांची योग्य ती विल्हेवाट लावणे
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही प्राण्याला संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल ट्विट द्वारे माहिती दिली आहे. हा प्रसार प्राण्यांमार्फत माणसांना पसरू नये यासाठी आधीच सावध असायला हवे.
We must all take steps to reduce the spread of SARS-CoV-2 and reduce the risk of transmission between animals and humans.
Together we can end the #COVID19 pandemic.@WHO @FAO @OIEAnimalHealth https://t.co/LuV9WjdTQ9
— Maria Van Kerkhove (@mvankerkhove) March 7, 2022