जर तुम्हला कोणी सांगितलं की कार ही आत्ता फक्त पाण्यावर चालणार आहे तर तुम्ही त्याला वेड्यात काढणार.. कोणी म्हणेल काय भाऊ मस्करी करतोस काय.पण बातमी खरी आहे .
टॉयटो मिराई – जपानच्या कार उत्पादक कंपनी टॉयटा ने ही कार आणली आहे. तसेच अलीकडे केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी ही कार लाँच केली आहे . ही कार पर्यावरण पूरक असून यात कोणतेही प्रदूषण होत नाही. उलट ज्वालानातून ही गाडी पाणी देते. ही कार FCEV आहे. म्हणजे ही कार फ्युएल सेल इलेक्ट्रिक वेहीकल आहे . यातून विद्युत ऊर्जा तयार करून बॅटरी त साठवली जाते आणि ही ऊर्जा गाडी चालवल्या साठी वापरली जाते.त्यामुळे कोणतेही नुकसान पर्यावरणास होत नाही .केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी ती स्वतः आपल्या ताफ्यात घेतली आहे.
कशी चालते कार पाण्यावर
ही कार फ्युएल सेल च्या तत्वावर काम करते . फ्युएल सेल पाण्याचे विघटन हैड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये विघटन करते . त्यामुळे अतिज्वालनशील हैड्रोजन वायू ही ऊर्जा मोटार च्या इंजिन ला देते आणि या हैड्रोजन ला ऑक्सिजन ज्वालानास मदत करतो. आणि यातून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. जेणे करून ही गाडी सुसाट धावते. आणि यातून फक्त पाणी हे बाहेर टाकले जाते.
काय आहेत वैशिष्ट्ये
जर ही कार पूर्ण पने चार्ज झाली तर 600 किलोमीटर चालेल असा कंपनी चा दवा आहे.ही गाडी चालवण्यासाठी प्रति किलोमीटर 1 रुपया पेक्षा कमी खर्च होईल. टॉयटो मिराईची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्ड मध्ये चांगला परफॅार्मंस देणारी कार म्हणून नोंद झाली आहे. या कारची सध्या ची किंमत 40.32 लाख आहे. तसेच इतर कार पेक्षा या कार चा वेग जास्त असेल.
भारताची पर्यावरण पूरक विकासाची संकल्पना
पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत असे भारत सरकार ने वेळोवेळी सांगितले आहे. त्याचाच भाग म्हणून भारत सरकार असे नवनवीन उपक्रम आणत आहे. ज्या प्रमाणे इलेक्ट्रिक वेहीकल ला सरकार ची सुबसिडी आहे. त्याच प्रमाणे सरकार या ला सुद्धा सबसिडी देईल.2047 पर्यंत ऊर्जा आत्मनिर्भर साठी सुद्धा भारतीय सरकार भर देत आहे. भविष्यात इंडियन ऑइल ही कंपनी सुद्धा हैड्रोजन च्या वापरासाठी प्रतिसाद भेटेल त्या दृष्टिने काम करीत आहे.