आवकशातलं एक वेगळं आकर्षण माणसाला नेहमीच भुरळ पाडत असतं. अवकाशात अनेक ग्रह उपग्रह आणि इतर अनेक कृत्रिम स्याटेलाईट्स वर अवकाशात असल्यामुळे काही नैसर्गिक तथा कृत्रिम गोष्टी आपसूकच घडत असतात. असच काहीसं सगळ्यांना चकित करणारी अवकशातली तेजोमय गोष्ट काल घडली. काय आहे नेमकी रहस्यमय बातमी चला तर आता जाणून घेऊयात.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून आकाशात दिसली उल्कापातासारखी दृश्ये.
यातील एक वस्तू महाराष्ट्रात चंद्रपुर जिल्ह्यात कोसळी असून ती धातूच्या कडीसारखी वस्तू असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे उपग्रहाचे किंवा प्रयोगशाळेचे धातूचे भाग असावेत असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून आकाशात पश्चिम दिशेकडे अनेक ठिकाणी उल्कापातासारख्या प्रकाशमान वेगात प्रवास करणाऱ्या जळत्या वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. उल्कापाताप्रमाणे अतिशय वेगाने या जळत्या वस्तू जमिनीच्या दिशेने येताना दिसत होत्या. या वेळी अनेकांनी ही दृश्ये आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. अनेक ठिकाणांहून चित्रित केलेली ही दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे अवशेष अवकाश यान, किंवा अंतराळ प्रयोशाळा किंवा उपग्रहाचे अवशेष असू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर, प्राथमिक अंदाजानुसार ही रॉकेट बुस्टर असल्याचेही काही तज्ज्ञांनी सांगितले.
View this post on Instagram
राज्यातील अनेक भागात आज सायंकाळच्या सुमारास ही दृश्ये एखादा उल्कापात व्हावा अशी दिसली. काहींना हे तुटलेले तारे वाटले. त्या ताऱ्यांना पाहून दंतकथेप्रमाणे अनेकांनी आपल्या मनातील इच्छा सुद्धा बोलून दाखवली. मात्र, हा उल्कापात आहे की तुटलेल्या उपग्रहाचे अवशेष आहेत असे प्रश्न अनेकांना पडले. त्यासोबतच हा काही धोक्याचा इशारा तर नाही ना असा विचारही अनेकांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने यासंदर्भात अमरावती येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ डॉक्टर अनिल बंड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यासंदर्भात माहिती देताना डॉक्टर बंड म्हणाले की, आकाशातून कधी उल्का किंवा अशनी पडत असतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे अवकाशात फिरत असलेले अर्धा किमी ते काही कीमी आकाराचे खगोलीय पिंड अचानक पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणासोबत होणाऱ्या घर्षणाने जळायला लागतात. बहुतांश वेळा हे पिंड किंवा उल्का हवेतच जळून नष्ट होतात. परंतु क्वचित वेळी(लाखात ऐक वेळा) यातील न जळलेला ऐकदोन किलो वजनाचा तुकडा जमिनीवर पडू शकतो. मोठ्या आकाराची उल्का पडल्यामुळे प्राचीन काळात डायनोसार नष्ट झाले होते हे आपल्याला माहीत आहे. उल्कापात हा बहुधा काही सेकंद होतो. परंतु उल्का पडायला इतका वेळ लागत नाही. त्यामुळे आज बघायला मिळालेला हा उल्कापात नसून कदाचित एखाद्या अवकाश यानाचे किंवा अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष, किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असु शकतात. मात्र, याबाबत आता नक्की काहीच सांगता येत नाही.
दरम्यान, आकाशातील या जळत्या वस्तूंचा काही भाग चंद्रपुरात कोसळला. हा तबकडीसारखा किंवा धातूच्या गोल कड्यासारखा भाग असल्याचे दिसत आहे. हा एखाद्या उपग्रहाचा किंवा प्रयोगशाळेचा एखाद्या भागाचा तुकडा असू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. हा तुकडा तपासणीसाठी नेण्यात आला आहे.