इंग्लंड सोबतच्या टेस्ट सिरीज च्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त वापसी केली आहे. चेन्नई च्या चेपॉक च्या मैदानावर तिसऱ्या दिवशीय खेळ संपताच भारत विजयाच्या केवळ 7 विकेट दूर आहे.
तिसऱ्या दिवशीय खेळात भारताची दुसरी पारी 286 वर होती ज्याच्या बळावर भारताने इंग्लंड पुढे 482 चा लक्ष ठेवले आहे या लक्ष्याचा पाठलाग करताना जेव्हा तिसऱ्या दिवसाची पारी संपताच इंग्लंडने 53 रण वर 3 विकेट गमावले आहे. चेन्नई चा चेपॉक मैदान ज्या खेळाडू चा घरेलू मैदान आहे सध्या तोच या मैदानावर चमकताना दिसतोय म्हणजेज रवीचंद्रन अश्विन , ज्याने टेस्ट मध्ये आपला पाचवा शतक पूर्ण केला आणि तिसऱ्या दिवशी पण आपली चमक दाखवली.
अश्विन ने आपल्या टीम च्या 11 व्या क्रमांकाच्या खेळाडू म्हणजेच सिराज सोबत 49 धावांची भागीदारी करत आपला 5 वा शतक पूर्ण केला. सिराज ने अश्विनला फक्त या भागीदारीत ना केवळ साथ दिला तर त्याचा शतकाचा असा आनंद लुटला कि अश्विन स्वतः त्याची प्रशंसा करत आहे .