आशिया कप २०२२ मधील आज होणारा सामना पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग हा साखळी सामन्यातील शेवटचा सामना असून या सामन्याच्या निकाला नंतर पुढील चित्र हे स्पष्ट होईल.
तत्पूर्वी काल श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात श्रीलंकेने बांगलादेश वर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.
आणखी वाचा : आशिया कप २०२२ श्रीलंकेची सुपर ४ मध्ये धडक.
आशिया कप मध्ये एकूण सहा संघ खेळत असून. ते दोन गटात विभागले गेले आहेत व सद्या अंकतालिकेनुसार
अ गट-१. भारत
२. पाकिस्तान किंवा हाँगकाँग
ब गट -१. अफगाणिस्थान
२. श्रीलंका
साखळीसामन्यानंतरचा पुढील टप्पा हा सुपर ४ चा असून अंकतालिकेच्या निकालानुसार,
३ सप्टेंबर ला सुपर ४ च्या पहिल्या लढतीत बी १ विरुद्ध बी २ म्हणजेच अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका.
तर ४ सप्टेंबरला अ १ विरुद्ध अ २ महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान ? होणार आहे.
त्यासाठी आज पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग च्या सामन्यात पाकिस्तान ला विजय मिळवावा लागेल.
तरच पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान… हे शक्य होणार
यापूर्वी झालेल्या साखळीफेरीत भारताने पाकिस्तानला व हॉंगकॉंगला पराभूत करत गुणतालिकेत अ १ मध्ये स्थान प्राप्त केले आहे.
आज होणाऱ्या सामान्यानंतर अ २ कोण असेल आणि ४ सप्टेंबर ला भारतासोबत कोण खेळणार हे निश्चित होईल. हॉंगकॉंग ने आशिया कप पात्र फेरी साठी ३ पैकी ३ सामने जिंकून आशिया कप स्पर्धेत सहावा संघ म्हणून अ गटात स्थान मिळवले. आणि भारताविरुद्ध च्या सामन्यात हार पत्करली असून शेवटच्या या पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात दोन्ही संघ आपली योग्यता सिद्ध करण्याचा अखेरचा प्रयत्न करतील.