पुन्हा हेराफेरी म्हणजे लवकरच ‘हेरा फेरी-3’ चीत्रपट आपल्याला पहायला मिळणार आहे. श्याम,राजु आणि बाबूराच त्रीकुट आपल्याला असविणार आहे. पुन्हा लोकांना त्यांचा आवडती “बाबूराव का स्टाईल” पाहायला मिळणार आहे.
सुपरस्टार अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावेल यांच्या ‘हेरा फेरी ‘ या अवीस्मरणीय हास्य चित्रपटाला नुकतेच 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. सोशलमिडीयात तर ‘हेरा फेरी’ चीत्रपटातील दृश्यांवरील मिम्स यांचा पुरच आला आहे. तब्बल 21 वर्षानंतर राजु,श्याम सोबत बाबूराव यांचा हास्य तडका आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिनेमाला 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. सीनेमाची संपुर्ण तयारी झाली असुन ते लवकरच सिनेमाचं चित्रिकरण सुरू करणार आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने फिरोज नाडियाडवाला यांनी अशी माहीती दीली की, ते लवकरच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत ‘हेरा फेरी-3’ या सिनेमावर काम सुरू करणार आहेत. फक्त ‘हेरा फेरी-3’ नाही तर या मालिकेत ते इतर सिनेमांचादेखील समावेश करणार आहेत ज्यांच नाव ‘हेरा-फेरी’या सिनेमाशी जोडलेलं असेल. ते पुढे म्हणाले की चाहत्यांनी 21 वर्षांपासून या सीनेमावर भरपूर प्रेम केले आहे त्यातच भर म्हणून “जेव्हा हेरा फेरी-3 बनेल तेव्हा 2-3 हेरा फेरी एकत्र बनतील”.
म्हणजेच यापुढे या सिनेमाचे अनेक भाग ते चाहत्यांसाठी आणणार आहेत. पुढील भागांमध्ये देखील उत्तम लेखन,दिग्दर्शन असणं महत्वाचं असून यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असे ते पुढे म्हणाले. यासोबतच पुढे काय होणार याची देखील पुसटशी कल्पना त्यांनी प्रेक्षकांना दीली आहे. जिथं ‘हेरा फेरी 2’ संपतो तिथुन पुढील सिनेमाला सुरुवात होईल. त्यामुळे ‘हेरा फेरी 2’ च्या शेवटाचं बंन्दुकींच रहस्य पुढील भागात म्हणजेच ‘हेरा फेरी 3’ मध्ये उलगडणार आहे. पुन्हा परेश रावल आणि सुनील शेट्टीची यांची जागा या सिनेमात नक्की आहे, परंतू अक्षयच्या भूमिकेचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही.
या सिनेमात अक्षय कुमार सिनेमात झळकणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती या सिनेमाच्या अधिकृत घोषणेची. अनेक चित्रपट लोकांच्या मनावर राज्य केलेली आहेत पण हास्य चित्रपटात ‘हेरा फेरी’ या चीत्रपटाने आजही चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. राजु, श्याम आणि बाबूराव यांच्या हास्य चाळयांनी तर आजही मिम्स वायरल होत असतात, हीच या सिनेमाच्या कलाकारांची कलेची खरी पावती म्हणावी लागेल.