तुम्ही रोज दुध पित असाल यार सावधान! कारण खुल्या आणि पाकिटातील येणाऱ्या दुधात असु शकते भेसळ. होय ! दूध पिणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते पण अनेक खुल्या किंवा पकिटमध्ये मिळणाऱ्या दुधात काही आरोग्यास हानिकारक घटकांचा समावेश करून निकृष्ट प्रतीचं दूध बनविल्या जातं. आणि हे काही प्रमाणात भेसळयुक्त दूध घराघरात पोहोचत आहे, त्यामुळे लोकांना पुरेशी पोषकतत्त्वे मिळत नाहीत सोबतच आरोग्यावर प्रतिकूल परीणाम पडतो. मग अश्या परिस्थितीत भेसळयुक्त दूध कसे ओळखाल ? भेसळयुक्त दूधाचे आपल्या आरोग्यावर किती वाईट परीणाम पडतात हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणुन घेणार आहोत. त्यामुळे हा लेख तुमच्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्हाला वाचल्यावर कळेलच. तर सर्वात आधी बघुयात हे बनावट दूध कसे ओळखावे.
बनावट दूध कसे ओळखाल?
१) तुम्ही दुधाच्या वासावरून ओळखू शकता. दुधाला साबणासारखा वास येत असेल तर त्याचा अर्थ भेसळ आहे.दुधाचा वास हळू हळू येत असेल तर दूध खरे आहे.
२) दुधात भेसळ आहे की नाही हे देखील दुधाच्या प्रवाहावर अवलंबून असते. अशा स्थितीत तुम्ही दुधाचे काही थेंब जमिनीवर टाकून पाहा की दूध हळू वाहत असेल आणि जमिनीवर ठसा उमटत असेल तर याचा अर्थ ते शुद्ध आहे. दुसरीकडे, जर दूध पाण्यासारखे वाहत असेल आणि त्याची छाप सोडत नसेल, तर याचा अर्थ दूध भेसळ आहे.
३) भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी तुम्ही दुधापासून बनवलेल्या खव्याची मिठाई देखील करू शकता.अशा स्थितीत दूध मंद आचेवर उकळून खव्यात बदलल्यावर दोन-तीन तास तसंच ठेवा. जर ते तेलकट झाले तर याचा अर्थ दूध चांगल्या प्रतीचे आणि अस्सल आहे. दुसरीकडे २-३ तासांनंतर खवा दगडासारखा झाला तर लगेच समजून घ्या की दुधात भेसळ झाली आहे. अशावेळी त्याचे सेवन टाळावे.
भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम
भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते, त्यापासून असाध्य आजार उद्भवण्याची शक्यता असते जसे की – आय.सी.एम.आर.च्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारखे अवयव निकामी होण्याची भीती असते, तसेच कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडतात.