रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे सुपर डुपर हिट जोडी खूप गाजली असून या जोडीचे अनेक चाहते आहेत. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी कित्येक चित्रपटात एकत्र काम केले चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या लग्नाविषयी इच्छा प्रकट केली होती. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकहाणी आणि ब्रेकअपबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल ! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा जेवढ्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात तेवढ्याच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतात. जरी आता त्यांचं वय ६९ वर्ष असलं तरी, त्यांचं वय दिसून येत नाही. रेखा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहेत. त्यांचा सौंदर्य आजही अनेकांना भुरळ पाडतं.
६९ वय असूनही रेखा आजही एखाद्या तरुण वयात दिसतात.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांची लव्हस्टोरी आणि ब्रेकअपबद्दल कोणाला माहिती नसेल हे कमीच शक्य आहे. अभिनेत्री रेखा यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने तिच्या लग्नाच्या योजनांबद्दल सांगितले. होय अनेकांना कदाचित त्याचं लग्न विषयीचे मत काय आहे हे माहिती नसेल अनेकांना रेखाजिंनी लग्न का केलं नाही हा अनेकांना प्रश्न पडला असेल परंतु आज आम्ही तुम्हाला त्यांच्याच मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी बोललेलं वक्तव्य तुम्हाला सांगणार आहोत.
रेखा यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी त्याच्या लग्नाच्या योजनांबद्दल सांगितलं. या मुलाखतीत रेखा म्हणाल्या की, तिचे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल! जेव्हा रेखा यांना पुनर्विवाहाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री म्हणाली, फक्त पुरुषच का, मला मुलीशी लग्न करायचं आहे. आता हे वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल पण होय हेच सत्य आहे.
या मुलाखतीत सिमी ग्रेवालने रेखा यांना विचारलं की, त्या पुन्हा लग्न करण्यास तयार आहेत का? किंवा यावर त्यांनी कधी याबाबत विचार केला आहे का? रेखा यांच्या या उत्तराने सिमीसह सगळ्या श्रोत्यांनाही धक्का बसला. लग्नाच्या प्रश्नावर रेखा यांनी दुसरा प्रश्न विचारला होता, ‘पुरुषाशी?’ यावर सिमीने हसून विचारलं की, ‘अजून काय? तू कोणत्याही मुलीशी लग्न करशील का? यावरही रेखाने पलटवार केला आणि म्हणाल्या की, ‘का नाही! मी मुलीशी लग्न का करू शकत नाही..’ रेखा यांचं वक्तव्य जरी जुनं असलं तरी आजही ते चर्चेत आहे. आणि आजही त्यांचे कित्येक चहा दे असले तरी ही खूपदा वायरल झालेली मुलाखत आहे.