‘Big Boss फेम’ अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हॉट एण्ड सिजलिंग क्वीन उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडिया वर नेहमीच ऍक्टिव्ह असते . चित्रविचित्र ड्रेस घालून ती तिच्या फॉलोवेर्स चे लक्ष वेधत असते. मात्र यावेळी उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा तोल गेल्याने ती धाडकन पडली आहे. पोझ देताना तिचा तोल बिघडला आणि ती खाली पडली.
या व्हिडीओमध्ये उर्फी आपल्या फ्रेंडसोबत पायऱ्यांवरून उतरत आहे आणि खाली उतरताना दोघेही पोझ देत आहेत मात्र उतरताना खाली कोसळल्यामुळे उर्फी धाडकन पडली . तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये हसणारा इमोजी पोस्ट केला ‘ट्रेंड चुकीचा झाला’.
हा व्हिडिओ पाहून लोक खूप हसत आहेत, तर कुणी हसणारा इमोजी बनवला तर कुणी उर्फीला सजग राहण्याचा सल्ला दिला कमेंट मध्ये देत आहेत. त्यामुळे असा व्हिडीओ स्वतः शेअर करण्याचे धाडस दाखवणाऱ्या उर्फीचं कौतुक देखील होत आहे.
View this post on Instagram
हिजाब मुद्यावर उर्फी जावेद ने दिली आपली प्रतिक्रिया :
उर्फी कायम तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे चर्चत असते. पण आता ती हिजाब प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. तिने ‘हिजाब’ प्रकरणावर मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
माध्यमांसोबत संवाद साधताना हिजाबवर उर्फी म्हणली की , ‘महिला त्यांना हवे तसे कपडे घालू शकतात. महिलांचे कपडे त्यांचं शिक्षण ठरवू शकत नाही. मला कळत प्रत्येक शाळेचे नियम असतात. पण भारतात धर्म एक संवेदनशील विषय आहे…’
‘महिला हिजाब घालत आहेत, तर त्या काही चूक करत नाहीत. प्रत्येकाला स्वतंत्र आहे. ज्या महिला हिजाब घालतात त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. मी लहानपणापासून हिजाब घातला नाही…’
साध्य कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. यावर अनेक सेलिब्रिटींनी आपलं मत व्यक्त केलं आहे.