लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध…लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहे. गेल्या महिन्याभरापासून या दोघांच्या लग्नाबद्दल विविध चर्चा सुरु होत्या. अखेर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे.
पाहुणे कोण आले मग???
करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, आकाश अंबानी यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट या दोन्हीही कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
आणि झाले बहुचर्चित बॉलीवुड लग्न
या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत. त्यांचे लग्न लागल्याची माहिती जरी मिळाली असली तरी अद्याप या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत. दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नानंतर सिनेसृष्टीतील इतर कलाकार आणि कुटुंबियांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. मात्र आता त्यात मोठा बदल करण्यात आला आहे. येत्या १६ किंवा १७ एप्रिलला पार पडणारे हे रिसेप्शन काही कारणांमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर कपूर आणि भट्ट कुटुंबियांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. आलिया आणि रणबीरचे लग्नासाठी चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले. विशेष म्हणजे सप्तपदी घेण्यापूर्वी गायत्री मंत्राचे पठणही करण्यात आले.
View this post on Instagram