बऱ्याचदा आपण मोबाईलवर बँक अकाउंट ट्रांजेक्शन गुगल पे असेल किंवा प्रायव्हेट माहिती सेव करून ठेवत असतो परंतु काही लोक आपली प्रायव्हेट माहिती हे कोणाला दिसू नये किंवा कोणाच्या हाती लागू नये यासाठी त्यात पासवर्ड देखील टाकून ठेवतात परंतु तरीही ही माहिती हॅक होऊ शकते.
आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर सर्रास करताना दिसतो.
मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा लोक एकमेकांसोबत बोलत नव्हते अशातला भाग नाही, मात्र मोबाईल आले संवाद आणखी सोपा झाला. स्मार्टफोनच्या येण्याने सगळी काम खूप सोपी झाली. अनेक काम सोपी झाली खरी पण तितकेच त्याचे धोकेसुद्धा वाढले. कारण मोबाईलमध्ये आपले अतिशय महत्वाची माहिती बँक अकाउंट डिटेल्स पर्सनल डेटा सगळं काही सेव्ह असत. आणि अशावेळी मोबाईल हॅक होण्याचं प्रमाण वाढतं. यानंतर आपला महत्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो.आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होत. अनेकवेळा युजर्सना आपला मोबाईल हॅक झाल्याचेही कळत नाही. हॅकर्स तुमचा सर्व पर्सनल डेटा चोरून त्याचा गैरवापर करू शकतात आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. बँक खात्यातील पैसे काढणे ते अगदी तुम्हाला ब्लॅकमेल करण्यापर्यंत सगळं काही घडत.
सध्या सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे आणि याला आळा घालण्यासाठी सुशिक्षित वर्गाने हा लेख नक्की वाचावा त्यामुळे याबाबतीत जागरूकता निर्माण होईल. पण तुमचा मोबाईल हॅक झालाय हे तुम्ही कसे ओळखू शकाल ? चला तर हे आजची अत्यंत महत्त्वाची बातमी खास तुमच्यासाठी आहे सर्वात आधी जाणून घेऊया मोबाईल हॅक झाल्यास ते आपण कसे ओळखायचे आहे.
मोबाईल हॅक झाल्यास कसे ओळखाल ?
मोबाईलचा स्पीड अचानक कमी होणे किंवा तो सतत हँग होऊ लागतो. अनेकदा असं होत आतापर्यंत फोन चांगला चालेल असतो आणि अचानक तो हँग होऊ लागतो अशा वेळी समजून जायचं कि फोनमध्ये मॅलवेअर आहे.
मोबाईल स्पीड कमी झाल्यास
चांगला चालणारा फोन अचानक स्लो काम करू लागतो आणि आपल्याला वाटतं कि कदाचित फोन हँग होतोय पण यामागे हॅकिंग हेसुद्धा कारण असू शकतं
मोबाईल बॅटरी वारंवार उतरत असल्यास
वारंवार चार्ज करूनसुद्धा फोनची बॅटरी उतरत असेल मोबाईल स्क्रीन बंद केल्यावरसुद्धा अँप काम करत असतील तर सावध व्हा कारण कोणीतरी तुमचा मोबाईल हॅक करत आहे. मोबाइलचे सेन्सर पुन्हा पुन्हा डिटेक्ट होऊ लागतात. हे देखील मोबाईल हॅक होण्याचं चिन्ह आहे.
एसएमएस आणि लिंक्स
बऱ्याचदा आपल्याला विशिष्ठ डिजिट असणाऱ्या नंबरवरून कॉल येतात मेसेजेस येतात आणि आपण त्यावर क्लिक करतो अजाणतेपणी केलेलं एक क्लिक तुमचा मोबाईल हॅक व्हायला पुरेसा आहे. कधी कधी एसएमएस द्वारे म्हणजेच विशिष्ट नंबरवरून एक लिंक पाठवली जाते कधी कधी तर युजर्सनी त्या लिंकला क्लिक केल्यास लगेच खात्यातून पैसे कमी झाल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे त्यामुळे सगळ्या युजर्सनी ही खबरदारी घ्यावी.