आजवर आपण आभासी चलनाबाबत बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. या बिटकॉइनचं नाव आपण कधी ऐकलंय का ? नेमकं हे आभासी चलन आहे तरी काय ? हे कसं काम करतं ? आपल्याला त्यात पैसे गुंतवता येतील का ? आणि बऱ्याच गोष्टी आज आपण जाणुन घेणार आहोत. तर बघुयात याबाबत सविस्तर माहिती.
Table of Contents
खरंतर या बिटकॉईनचे विकसक सातोशी नाकामोटो असून याची स्थापना जानेवारी ३ जानेवारी २००९ साली करण्यात आली होती पण हे बिटकॉईन जुलै 2020 मध्येही चर्चेत आलं होतं. तेव्हा बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांसोबतच अमेरिकेतल्या अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याला बिटकॉईन स्कॅम म्हटलं गेलं होतं. याद्वारे बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली होती.
क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनचा काय संबंध ?
खरंतर क्रिप्टोकरन्सीला आंतरजालीय चलन देखील म्हणतात. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. म्हणजेच ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरुन नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.
म्हणजे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं नसतं.
कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात.
जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलनं आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत.
आता बिटकॉईन म्हणजे काय ? हे आपण जाणुन घेऊयात.
खरंतर बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.
जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.
हे खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग असं म्हणतात.
आपल्याला बिटकॉईनचा फायदा कसा करून घेता येईल ?
यात आपण करत असलेल्या व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत, मागणी व पुरवठा ठरवित असते. वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करत असतात म्हणजे एकंदरीत वस्तू विकणाऱ्याच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, जर हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल, तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करत असतो.
बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नसतो.
आणि यात कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. पण इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही. पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण नक्कीच इथून होऊ शकते.
Author:
प्रिया गोमाशे.