सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणं आहेत – ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलंही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच त्या व्यक्तीला कोव्हिड-19 चाचणी करण्यासही सांगण्यात आलं आहे.
मात्र, लहान मुलांबाबत ब्रिटीश संशोधक करत असलेल्य या अभ्यासावरून लक्षणांच्या यादीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संशोधनात जवळपास एक हजार लहान मुलांचा समावेश करण्यात आला. मेडरिक्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार 992 मुलांपैकी 68 मुलांच्या शरिरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज आढळल्या.अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने कोव्हिड-19 च्या लक्षणांमध्ये मळमळ, उलटी आणि अतिसार यांचा समावेश केलेला आहे.ही लक्षणं आढळताच तुम्ही सतर्क होऊन सर्व ती काळजी घ्यायची आहे. यात वैद्यकीय सल्ला घेण्याचाही समावेश आहे.
तीन लक्षणं कुठली?
१.सारखा खोकला येणं – कोरोनाची लागण झालेली असल्यास सारखा खोकला येऊ शकतो. एकदा खोकल्याची उबळ आली की, जवळपास तासभर किंवा त्याहून अधिक वेळेसाठी खोकला येऊ शकतो. 24 तासात तीन किंवा त्याहून जास्त वेळा अशी उबळ येऊ शकते. खोकल्यामध्ये कफ असल्यास तेसुद्धा काळजीचं कारण असू शकतं.
२.ताप – या विषाणूमुळे थंडी वाजून ताप येताना दिसतो.
३.गंध आणि चव जाणे – तज्ज्ञांच्या मते खोकला आणि ताप याव्यतिरिक्त हेदेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.त्यामुळे तुम्हाला किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत रहाता त्यापैकी कुणाला यातलं एकही लक्षण आढळल्यास घरीच आयसोलेट व्हा, जेणेकरून इतर कुणाला संसर्ग होऊ नये.अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेच्या म्हणण्यानुसार थंडी वाजणे, थरथरणे, अंगदुखी आणि घसा खवखवणे हीसुद्धा कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं असू शकतात.
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास काय करावे?
कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं असल्यास त्यांनी स्वतःला घरातच सेल्फ आयसोलेट करायला हवं.तज्ज्ञांच्या मते कोरोनाची सौदरम्यान,
लहान मुलांना कोव्हिड-19 चा धोका किती? याचा काही महिन्यांपूर्वीच बीबीसीनं आढावा घेतला होता, तो खालीलप्रमाणे :
मुंबईल्या एका नवजात बाळाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. चेंबूर इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर हे हॉस्पिटल सील करण्यात आलं.
पण कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये झालेल्या टेस्ट नंतर या बाळाला लागण झाली नसल्याचं समोर आलं. मीडियामध्ये या प्रकारच्या बातम्याही आल्या.
लहान मुलांना कोव्हिड-19 ची लागण होते?
मग प्रश्न असा आहे की नवजात बालकांना, बाळांना किंवा लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का?फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये एका नवजात अर्भकाला जन्मानंतर अवघ्या 30 तासातच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तिथल्या मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार हे बाळ 2 फेब्रुवारीला वुहानमध्ये जन्मलं होतं आणि कोरोनाची लागण झाल्यानंतर जगातलं सगळ्यात कमी वयाचं कोरोनाचं रूग्ण ठरलं.म्य लक्षणं असल्यास थेट हॉस्पिटलमध्ये जाणं टाळलं पाहिजे. मात्र, गरज असेल तर डॉक्टरांशी जरूर संपर्क करावा.