देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून कामगार आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता सोनू सूद आताही आपल्या मदतीचं काम करतो आहे. स्वतः कोरोनाने बाधित झालेला असतानाही त्याने देशभरातील शेकडो लोकांची मदत केल्याने अनेक लोक त्याच्या कामाला सलाम करत आहेत. सोनू सूदच्या मदतीच्या सातत्याने अनेकजण अवाक झालेत. जणू सोनू सूद लोककल्याणासाठी दुसरेसरकारचालवतोयकीकायहेत्याच्या कोरोना निवरण्याच्याकामा च्या तपशील बघून वाटते.आताही असाच अनुभव आलाय.
नागपूरमधील एका तरुणीने वडिलांना कोरोना संसर्ग झाल्याचं सांगत व्हेंटिलेटर मिळत नसल्याची अडचण सांगितली आणि सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली. यावर सोनू सूद यांनी तात्काळ तिला आधार देत मदतीचं आश्वासन दिलं.
नागपूरच्या रोशनी बुराडे या तरुणीने ट्विट केलं, “माझे पप्पा कोरोना बाधित आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची खूप गरज आहे. संपूर्ण नागपूरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. सोनू सूद सर मला कृपया मदत करा. माझ्या पप्पांना वाचवा प्लिज. तुम्हीच मला मदत करु शकता.” यावर सोनू सूदने तात्काळ प्रतिसाद देत तुझ्या वडिलांना काहीही होणार नाही. एका तासात त्यांना व्हेंटिलेटर मिळेल असं ट्विट केलं.”
आपके पापा को कुछ नहीं होने देंगे।
1 घंटे में पापा को वेंटीलेटर बेड मिल जायेगा।@Dastenavar@IlaajIndia @SoodFoundation https://t.co/iduOMmGL7P— sonu sood (@SonuSood) April 22, 2021
सोनू सूदच्या मदतीचे आकडे:
21एप्रिल 2021
ऑक्सिजनती मागणी – 127
उपलब्ध करण्यात यश – 93
रेमडेसिवीरची (Remdesivir) मागणी – 527
उपलब्ध करण्यात यश – 83
आयसीयू बेडची मागणी – 422
उपलब्ध करण्यात यश – 196
19 एप्रिल 2021
बेडसाठीची मागणी – 570
उपलब्ध करु शकण्यात यश – 112
रेमडेसिवीरची मागणी – 1477
उपलब्ध करुन देण्यात यश – 18
इतकी मदत करुनही सोनू सूद यांनी हो आम्ही अपयशी ठरलोय हे कबूल केलं. तसेच ही अशीच आपली आरोग्य यंत्रणा आहे, असंही नमूद केलं.
लोकांसाठी ‘मसीहा!’
बॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
कोरोना काळात लाखो लोकांना मदत
कोरोना काळात जगातील अनेक लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. या काळात सोनू सूदने लोकांना मदतीसाठी हात पुढे केला होता. लाखो लोकांना त्याने कोरोना काळात मदत केली. तसेच आताही तो अनेकांची मदत करतो. अनेक लोक त्याच्याकडे अनेक प्रकारची मदत करतात.
परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठीही सोनू ठरला देवदूत
देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेली मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली.
अभिनेता सोनू सूद पंजाबच्या कोरोना लसीकरण मोहिमेचा ब्रँड अँम्बेसेडर.
अभिनेता सोनू सूदला पंजाबने कोरोना लसीकरण मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं आहे. ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Happy to share that actor & philanthropist @SonuSood will be the Brand Ambassador of our #Covid19 vaccination drive. I thank him for supporting our campaign to reach out to, and protect, every Punjabi, and appeal to all to get vaccinated at the earliest. pic.twitter.com/1083v6M0FP
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) April 11, 2021
अनेक लोकांचा तारण हार बनलेला सोनू सूद जर एवढे चांगले काम राजकारणी कींवा उद्योगपती नसून एवढे करू शकतो तर आपण निवडून दिलेले राजकारणी काय करू शकतात हे सोनुच्या कामांचा पाठ पुरावा केला की समजते. जणू गरिबांचा, दिन दूबळ्यांनचा तो कैवारी बनला आहे. आणि सामान्य लोक ही काही समस्या जाणवल्या की डायरेक्ट न घाबरता सोनू सूद कडे त्यांच्या दुःखाचे समाधान म्हणून पाहत आहेत. सिने सृष्टीत जरी सोनू गुंडांच्या भूमिका करतो पण खऱ्या जीवनात तो किती महान आहे हे त्याच्या एक वर्षाच्या कामानारून आपल्याला कळते.