मुंबई: दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असून, अनेक खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणीही केली जातेय. राज्य सरकारच्या वतीने रात्रीच्या कर्फ्यूबरोबर अनेक कडक निर्बंध लागू केले गेलेत. दिल्लीतील नाईट कर्फ्यू आणि महाराष्ट्रातील कर्फ्यूसह शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. दररोज रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत दिल्लीत सर्व काही बंद राहील. ही बंदीची कारवाई 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये होती दारुसाठी सूट होती.
गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान घरात दारूच्या डिलिव्हरीसाठी सूट होती. फोनवरून दारू मागविण्याची सुविधा देण्यात आली. नंतर ते ऑनलाईनही झाले. आयएमएफएल, बिअर आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना परमिट धारकांच्या घरी मद्यप्राशन करण्याची परवानगी होती. टोकन सुविधा निश्चित कालावधीसाठी पुणे आणि नाशिक येथे सुरू केली गेली होती.
पुणे आणि नाशिकमधील घाऊक विक्रेत्यांनी मोबाईल अॅप तयार केले होते, ज्याद्वारे लोकांना ऑनलाईन टोकन मिळू शकत होते. टोकन नंबर मिळाल्यानंतर लोकांना त्यांचा स्टॉक एका निश्चित कालावधीत मिळू शकेल. फोनद्वारे लोकांना दारूचा टोकन नंबरही मिळू शकत होता.
सर्व प्रकारच्या बार आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार
पुढील आदेश येईपर्यंत शहरे आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या बार आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितलेय. सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात कोणत्याही मद्याचे उत्पादन विकू दिले जाणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत घाऊक किंवा किरकोळ दारूची विक्री बंद राहील. या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणार्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
अल्कोहोल निर्मितीवर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाही आणि मद्य कारखाना पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, उत्पादन युनिटमध्ये काम करणाऱ्या लोकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल आणि सामाजिक अंतरावर लक्ष दिले जाईल.