वाढती कोरोना रुग्ण वाढ आणि अपुऱ्या पडत असणाऱ्या वैद्यकीय साधने यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. त्यातच भारतीय रेल्वे ने थेट रेल्वे डब्ब्यानाच आता विलागिकरण कक्ष म्हणून काही बदल करण्यात आले आहेत. नंदुरबार रेल्वे स्थानकावरील रेल्वे डब्ब्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.
चक्क टाकाऊ पासून टिकाऊ:
आपल्या वापरण्यात येणारी धान्याची पोती वापरून रेल्वे छतावराती हाथरून रेल्वे डब्ब्यातील अंदराचे तापमान कमी करण्यात येणार आहे. त्यातच एअर कुलर वापरण्याचा रेल्वे चा मानस आहे . रेल्वेच्या बर्थ यांच्यावर छान पांढऱ्या रंगाच्या चादरी आणि उष्या याद्वारे त्यांचे बेड बनविण्यात आले आहे. रेल्वे प्रशासना कडून अशी मदत फार कौतुकासपद आहे.