“देवमाणूस” मालिका बघता, खरच सत्य घटनांवर मालिका आधारित आहे काय?
मालिकेमध्ये डॉक्टर अजितकुमार देव याने जी भूमिका साकारली आहे ती व्यक्तिरेखा खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील होती. या वर आधारित या घटनेत हा उल्लेख करण्यात आला आहे. किंबहुना ही मालिका त्यावर आधारित आहे. मालिकेमध्ये अजित्कुमार देव साताऱ्यामध्ये अनेकांना फसवताना दाखवण्यात आले आहे. यामध्ये त्याने रेशमा, अपर्णा, मंजुळा यांच्यासह इतर तिघींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कंपाउंडर बनवून त्यांची हत्या केली. यासाठी त्याला डिंपल हिने मदत देखील केली आहे. ही घ’टना प्रत्यक्षात घ’डलेली आहे. त्यावर आधारितच Zeeमराठी वर मालिकेत घेण्यात आलेली आहे. ही घ’टना काही वर्षांपूर्वी वाई धोम येथे घ’डली होती. “वाई धोम” हे हत्याकांड राज्यात गाजले होते.
मालिकेत लंपट आणि बायांना आपल्या नादी लावणारा डॉक्टर या विषयी:
वाई धोम परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी भुरटा डॉक्टर ‘संतोष पोळ’ याने जवळपास सहा जणांना जिवंत गाडले. ही कथा आजही चवीने चर्चिले जाते. हे प्रकरण घडल्यानंतर तो शहरातून गा यब झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा बराच शोध घेतला होता. मात्र तो काही केल्या सापडत नव्हता. तेरा वर्ष त्यने जवळपास काळे धंदे केले होते. मात्र, अखेर पोलिसांनी 2016 मध्ये त्यला दादर येथून अटक केली.
डिंपल साकारत असलेली भूमिका ही आहे खरी:
संतोष पोळ याला परिचारिका ज्योती मांद्रे हिने खूप मदत केली होती. मात्र, ती आता माफीची साक्षीदार झाल्याने संतोष पोळ याचे धंदे उघडकीस आले आहे. या प्रकरणात माफीची साक्षीदार झालेली परिचारिका ज्योती हिने पोलिसात सर्व काही खरे सांगितले. मी संतोष पोळ याची अनेकदा मदत केली, असे देखील तिने सांगितले. 13 वर्ष जवळपास तो पोलिसांना गुंगारा देत होता.
डिग्री ही सुद्धा मालिकेत दाखविल्या प्रमाणे होती बोगस:
डॉ’क्टर संतोष पोळ हा आपल्या खोट्या थापा ने सर्वांना फसवत होता. तो डॉक्टर असल्याचे सांगत होता. मात्र, पोलिसांनी त्याचे रजिस्ट्रेशन पाहिले असता त्याची डिग्री बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो बोगस डॉक्टर असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवून त्याच्यावर कारवाई केली.
फार्म हाऊसमध्ये सापडला होता सांगाडा:
त्यानंतर हे सत्य बाहेर आले. तिने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी एका फार्महाऊसवर खोदकाम केले असता एका नारळाच्या झाडाजवळ एक सां गाडा सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची डीएनए चाचणी केली असता तो सांगाडा मंगला जेधे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी पोलिसांनी अधिक खो दकाम केले असता इतर पाच सांगाडे देखील मिळून आले. मालिकेत संजू,रेशमा, आणि अपर्णा यांना गाडल्याचे आपण बघितलेच आहे. अनेक वेळा डॉक्टर याला पकडण्यात पोलिसांना यश येते पण तो फार शिताफीने अनेकवेळा सुटला आहे. आता नव्या आलेल्या महिला पोलिस अधिकारी डॉक्टरचं भांड फोडणार का हे आपल्याला लवरच कळेल.
मात्र, प्रत्यक्षात या वाहिनीवर सुरू असलेली ही मालिका याचे काही समर्थन करत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या घटनेशी संबंधित असलेले पात्र यामध्ये दाखवण्यात आलेली आहे.