गुजरातमधील रहिवासी असलेल्या या मुलीने आपला व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय बनविण्यासाठी मार्कंडेय महादेव मंदिरात फ्रान्समधील मुलाशी लग्न केले. अहमदाबादची धरती राणा काही वर्षांपूर्वी काशीला फिरायला आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये गंगा घाटावर तिची भेट फ्रान्सच्या लिली शहरातील रोमनशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली जी हळूहळू प्रेमात बदलली. तथापि, त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य दोघांच्या लग्नात सामील नव्हते. हिंदू धर्माच्या रीती रीवाजानुसार झालेल्या लग्नात दोघांच्या ओळखीच्यांनी धार्मिक रीतीरिवाज पूर्ण केल्या.
धरती काशीमध्ये स्वतःचे रेस्टॉरंट चालवते. धरतीनी सांगितले की तिचा भगवान शंकरांवर खोल विश्वास आहे. म्हणूनच काशीमध्ये फिरताना तीने काहीतरी करण्याचा विचार केला. त्यानंतर तिने राणा महल घाटाजवळ एक रेस्टॉरंट उघडले. त्याच दरम्यान तीची भेट फ्रान्सच्या रोमनशी झाली . धरतीने सांगितले की आमचे दोघांचे विचार मिळतेजुळते होते. मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोमन दिल्लीतच एका कंपनीत काम करतो.