Elon Musk Buys Twitter/Twitter Deal :
मस्क यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर कंपनी आणखी चांगल्या ऑफरचा शोध घेत होती. परंतु मस्क यांना ट्विटर मिळवण्यात यश मिळालं आहे. फ्री स्पीचसाठी ट्विटरचं खासगीकरण होणं गरजेचे आहे असं मस्क यांचं म्हणणं होतं. त्यासाठी ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला.टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यावरून चर्चा वाढल्या होत्या. अखेर ट्विटरनं इलॉन मस्क यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार केल्यानं आता ४४ अब्ज डॉलर(सुमारे ३३६८ अब्ज रुपये) किंमतीला मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं आहे. ट्विटर खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित करत असल्याचे मस्क यांनी नुकतेच सांगितले होते. ट्विटरनं हा व्यवहार पक्का केला असून यावर्षीच ही डील पूर्ण होईल. Elon Musk यांच्याकडे ट्विटरची ९ टक्के भागीदारी होती परंतु आता Elon Musk यांच्याकडे ट्विटरचे १०० टक्के हिस्सा आहे. त्यांनी ५४.५० डॉलर्स प्रति शेअर या दराने कंपनी खरेदी केली आहे.
नवा कॉइन ‘एलन बाय ट्विटर’ विरुद्ध डॉजकॉइन: (Dogecoin vs Elon buy twitter Cryptocurrency)
‘एलन बाय ट्विटर’ नाण्याची किंमत क्षणार्धात गगनाला भिडलेली असताना टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनची किंमतही हा करार पूर्ण झाल्यानंतर गगनाला भिडली. क्रिप्टो मार्केटमध्ये डॉजकॉइन २०.८९ टक्क्यांच्या वाढीसह १२ ६२ रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या २४ तासांत त्याची किंमत २.१८रुपयांनी वाढली आहे. मात्र, किंमतीत आता बदल झाला आहे. विशेष म्हणजे, ट्विटरच्या विक्रीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, क्रिप्टो बाजारातील टॉप-१० क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढल्या.
तर इतर डिजिटल चलने देखील हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसल्या. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन बद्दल बोलायचे तर ते २.७७ टक्के किंवा ८७ हजार ८४१रुपयांनी वाढून ३२ लाख ५४ हजार ७८९ रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, इथरियम ही दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी 3.81 टक्के किंवा ८ हजार ८३७ रुपये वाढली आणि त्याची किंमत २ लाख ४१ हजार ०१८ रुपये झाली आहे.ब्लूमबर्गचा अंदाज आहे की मस्ककडे केवळ 3 अब्ज डॉलर्सची रोकड आणि काही विक्री योग्य मालमत्ता आहेत. दरम्यान, ‘एलॉन बाय ट्विटर’ नावाचे क्रिप्टो कॉईन लॉन्च केले आहे. हे एका क्षणात गगणाला भिडले असले तरी याकडे घोटाळ्याच्या नजरेतूनही Cryptocurrency तज्ज्ञ यांचे मत समोर आले आहे.
#ElonMusk यांच्याकडे ट्विटरची ९ टक्के भागीदारी होती परंतु आता Elon Musk यांच्याकडे ट्विटरचे १०० टक्के हिस्सा आहे. त्यांनी ५४.५० डॉलर्स प्रति शेअर या दराने कंपनी खरेदी केली आहे.त्यामुळे आता ट्विटर एक प्रायव्हेट कंपनी असेल ज्याचे मालक इलॉन मस्क असतील. ही बातमी मयुर मेश्राम यांनी लिहिली असून आपण अश्याच क्रिप्टोकरन्सी संबधित माहितीसाठी आपल्या मराठी Shout ला नियमित भेट देत रहा.