सध्या पावसाळा सुरू आहे. आणि पावसाळा म्हटलं की त्यात चिंब होऊन भिजले नाही असं होणार नाही. अशातच जर छान मुसळधार पाऊस असेल तर त्यात मनमुराद भिजल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. पण यात आपण अनेकदा वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतो हे आपल्या लक्षातच येत नाही. पावसाळ्यात पुष्कळदा वातावरण थंड देखील असते. त्यामुळे पावसात भिजल्यावर थंडी लागून ताप येणं साहजिकच आहे. त्यामुळे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातल्या फळांचा उपयोग करून आपण निरोगी राहू शकतो. जर आपण पावसाळ्यात आपण आपल्या खाण्यावर विशेष लक्ष दिले तर, आपल्याला कोणतेही गंभीर आजार होणार नाही. त्यासाठी असेही काही फळे आहेत जी खाल्ल्याने आपण पावसाळ्यात आजारांपासून आपला बचाव करु शकतो. तर बघुया ती नेमकी कोणती फळे आहेत जी पावसाळ्यात आरोग्यवर्धक आहेत.
१) आलूबुखारा
आलूबुखारा हे एक स्वादिष्ट आणि चविष्ट असे फळ आहे. पावसाळ्यात इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित तक्रारींपासून दूर राहण्यासाठी याचे सेवन अवश्य करावे. रोज आलूबुखारा खाल्ल्याने इम्यून सिस्टम मजबूत होतो. यातील अँटी ऑक्सीडेंट मुळे आजारांचा धोका कमी होतो. रक्तप्रवाहासाठी आलूबुखारा हे एक चांगले फळ आहे. त्यामुळे रोज एकतरी फळ सेवन करावे.
२) जांभूळ
पावसाळ्यात जांभूळ पिकायला सुरुवात होते, त्यामुळे त्याचे सेवन करणे शरीरासाठी खूपच फायद्याचे मानले जाते. जांभळात आयर्न, पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटामिन ची योग्य मात्रा असते. याचे सेवन केल्याने पोटदुखी आणि इंफेक्शनपासून बचाव होतो. हे डायबिटीज आणि कर्करोग असलेल्या रुग्णांना खूपच फायद्याचे आहे.
३) चेरी
चेरी हे एक असे फळ आहे, ज्याचे पावसाळ्यात सेवन करणे खूपच फायद्याचे मानले जाते. व्हिटामिन ए,बी, सी, बीटा कैरोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि पोटॅशिअम युक्त असे हे फळ आहे. यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. व्हिटामिन सी चे प्रमाण चेरीमध्ये अधिक असल्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने आपला इंफेक्शन पासून बचाव होतो.
४) नास्पती
फायबरयुक्त असलेले नास्पती हे फळ खूपच गोड आणि मधूर असे फळ आहे. याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटी ऑक्सीडेंट्स मात्रा जास्त असते. त्यामुळे तुम्ही जर आपले वजन कमी करु इच्छिता तर नास्पतीचे सेवन अवश्य करा. याने कर्करोग, हायपरटेंशन, डायबिटीज आणि हृद्याशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.
५) डाळिंब
पावसाळ्यात आजारापासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. फायबर आणि व्हिटामिन ने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन तसे वर्षभर करता येते मात्र पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित काही तक्रारी असतील तर दूर होतात.
तर ह्या सर्व फळांचा आस्वाद घेऊन सुद्धा आपण अस्सल पावसाळ्याचा आनंद लुटू शकतो. काही आहारतज्ञ सांगतात की, अपल्याला फळे आवडत नसल्यास काही फळांचे काप करून आवडेल तसे फळांचे सलाद बनवुन देखील खाऊ शकता. किंवा फळांचे ज्यूस करून देखील पिऊ शकता.