आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट असून त्याचा वापर हा सर्व ठिकाणी केला जातो. आधार कार्ड तुम्हाला अपडेटेड डिटेल्स सोबत हवे असेल तर UIDAI चे एक नवीन फीचर आले आहे. हे आधार कार्ड वापर करणाऱ्या युजर्संना खूप फायदेशीर ठरणार आहे.
फेस ऑथेंटिकेशन असं या नवीन आधार कार्ड फीचरचं नाव आहे. म्हणजेच आता आधार कार्ड होल्डर व्यक्ती ऑनलाईन आपल्या चेहऱ्याच्या मदतीने आपले आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो. यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल. फेस ऑथेंटिकेशन फीचर विना ओटीपी काम करते. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून आपल्या लॅपटॉपवरून करू शकता.
कसा कराल ‘या’ फीचरचा वापर.?
– सर्वप्रथम तुम्हाला यूआयडीएआय uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
– होमपेजवर Get Aadhaar Card हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
– असं केल्यावर face authentication हा पर्याय दिसेल.
– Face Authentication निवडण्यापूर्वी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल
– तुम्हाला ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे चेहरा वेरिफाय करावा लागेल.
– यानंतर ओकेवर क्लिक करा, हे करताच कॅमेरा सुरू होईल. आपला संपूर्ण चेहरा एका चौकटीत येईल अशा प्रकारे आपल्याला कॅमेरासमोर बसावे लागेल.
– कॅमेरा आपला फोटो घेईल आणि ही प्रक्रिया येथेच संपेल. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.