सध्या वेगवेगळ्या ॲप्स वरून आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो फोन पे, गुगल पे, भीम ॲप, व्हाट्सअप आणि अनेक सोशल मीडियाद्वारे सुद्धा आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा देवाण-घेवाण करू शकतो परंतु तुम्हाला माहिती आहे का ? आता यूपीआय पेमेंट सुद्धा आपल्याला फक्त आपल्या आधार कार्ड वरून करता येऊ शकतो, मग चला तर जाणून घेऊया या खास लेखातून हि महत्त्वाची माहिती.
भारत वेगाने डिजिटल पेमेंटकडे जात आहे. डिजिटल पेमेंटचा मार्ग सोपा बनवण्यासाठी आरबीआय आर बी आय आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफर इंडिया एन पी सी आय नियमाला सोपे बनवत आहे. यासाठी आधार बेस्ड यू पी आय पेमेंट सर्विसला परवानगी दिली आहे. आर बी आय आणि एन पी सी आयकडून मिळालेल्या सूटनंतर फोन पे ने नवीन आधार बेस्ड ओटीपी सर्विसची सुरुवात केली आहे. यावरून यू पी आय ॲक्टीवेट केले जावू शकते.
फोन पे बनले पहिले आधार बेस्ड यू पी आय
फोनपे चा दावा आहे की, ते आधार बेस्ड यू पी आय सर्विसचा जगातील पहिला प्लॅटफॉर्म आहे. कंपनीचा दावा आहे की आधार बेस्ड यूपीआय सर्विस नंतर ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या नवीन यूजर्सच्या संख्येत वाढ होईल. अजून पर्यंत यूपीआय सर्विसचा वापर करण्यासाठी डेबिड कार्डचा वापर केला जात होता. परंतु, आता आधार बेस्ड अथेंटिकेशन नंतर डेबिट कार्डची झंझट संपणार आहे. खरं म्हणजे देशातील अनेक लोकांकडे डेबिड कार्ड नाही. जे यूपीआय सर्विसचा वापर करू शकत नाही. त्या लोकांसाठी आधार बेस्ड यू पी आय सर्विस खूप फायदेशीर ठरू शकते. आणि पद्धत तेवढीच सुरक्षित देखील आहे.
यू पी आय च्या उपलब्ध मॉडलमध्ये प्रत्येक यूजर्ससाठी यू पी आय रजिस्ट्रेशन प्रॉसेस दरम्यान यू पी आय पिनसाठी डेबिट कार्ड आवश्यक होते. परंतु, मोठ्या संख्येत बँक अकाउंट होल्डर उपलब्ध आहेत. ज्यांना डेबिट कार्ड ठेवायचे नाही. यासाठी फोन पे ची नवीन सर्विस आधार बेस्ड ई-केवायसी केली जावू शकते. यासाठी फोन पे ॲपवर आधारासाठी ६ डिजिट नंबर टाकावा लागेल. यानंतर UIDAI वरून ओ टी पी रिसीव होईल. यानंतर तुम्हाला बँक ऑथेंटिकेशन प्रोसेसला पूर्ण करावे लागेल. यानंतर यूजर्सला यू पी आय पेमेंट चे सर्व सर्विस सारखे पेमेंट चेक आणि बँक बॅलन्स चेक करू शकतील. त्यामुळे तुम्हीदेखील ही सोपी पद्धत नक्किच ट्राय करू शकता.