तुम्ही देखील पतंजली कंपनीचे प्रॉडक्ट वापरता का ? जर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातून अनेक प्रकारची औषधं तयार केली जातात. औषधांतून आयुर्वेदिक उत्पादनंही घेतली जातात. मात्र, योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपला मोठा धक्का बसलाय. पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणानं दिले आहेत. आता ती पाच औषधं कोणती आहेत ते आपण सविस्तर खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
खरंतर आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरण उत्तराखंडनं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या दिव्या फार्मसीला पाच औषधांचं उत्पादन थांबवण्यास (Patanjali Medicines Ban) सांगितलंय. याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के व्ही बाबू यांनी प्राधिकरणाकडं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीनं औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचं उत्पादन केलं जात होतं. परंतु या औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली, पण ते का ? हे आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
खरंतर, माहिती घेतल्यानांतर प्राधिकरणानं या औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश पतंजली समूहास देण्यात आले. तर, या औषधांचं पुन्हा उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे. प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. तसंच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आता आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीनं करण्यात आला आहे.
कोणत्या पाच औषधांवर बंदी ?
पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता. केरळस्थित नेत्रचिकित्सक केव्ही बाबू यांनी यावर्षी जुलैमध्ये या औषधांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलीय. परंतू याबाबत आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं पतंजलीनं सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही जर पतंजली कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरत असाल तर आणि तुम्हालाही जर बीपी, डायबेटिस सारखे आजार असतील तर सावधान. कारण तुम्हाला देखील ही आयुर्वेदिक औषधे प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार करतांना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा.