वरील हेड लाईन वाचून तुम्हाला चक्रावल्यासारख होत असेल पण, वीज्ञानाच्या साहाय्याने अशक्य गोष्टी ही शक्य झाल्याचे आपण स्वतः पाहिले असेल. त्यातच आय. आय. टी. मंडीने आपल्या रोजच्या वापरातील मास्क आणि पीपीई किट साठी अँटी बॅक्टरियाल कापड तयार केले आहे.
हे डोळे दिपवून टाकणारे कार्य करण्यात प्रामुख्याने डॉ. अमित जैस्वाल, सहाय्यक अध्यापक, स्कूल ऑफ बेसिक सायन्स,आय. आय. टी. मंडी आहेत, त्यांच्या सोबत शोधकर्मी वैज्ञानिक प्रवीण कुमार, शौनक रॉय, आणि कु. अंकिता सरकार यांचे योगदान आहे. हा शोध दुसऱ्या कोरोना लाटेला पांगवण्यासाठी लावल्याचे ते सांगतात.या शोधकामाचे निकाल अमेरिकेतील, अमेरिकन केमिकल सोसायटी येथे प्रकाशित झाले आहेत.
का वापरावा मास्क?
या कोरोना काळात, लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग म्हणजे चेहरा झाकणारा मास्क. मास्क याची निर्मिती बाहेरील वातावरणाशी मास्क घालणाऱ्याव्यक्तीचे सौरक्षण जिवणूनशि न होन्या करीता केली होती. परंतु कोरोना विषणूनशी लढायला हे मास्क जीवाणू प्रतिरोधी असायला हवे जेणे करुन ते त्या जीवाणूंना आळा घालतील. याचप्रमाणे जीवाणू पासून संरक्षण करणे हे धुवून परत वापरणाऱ्या मास्क चे ही काम आहे जे एक वेळा वापरून टाकणाऱ्या मस्कपेक्षा पर्यावरण पूरक आहे.
” कोरोना मुळे पर्यावरण पूरक आणि किमतीने कमी असणाऱ्या कपडावरती आमचे संशोधन सुरू होते. आम्ही अशी एक रासायनिक प्रक्रिया शोधून काढली आहे जी प्रामुख्याने पीपीई किट आणि मास्क यांच्यासाठी वापरण्यात येईल. आम्ही काही कपडही शोधून काढले जे की स्वतः जिवणूनशी लढेल” असे डॉक्टर अमित यांचे म्हणणे आहे. यासाठी या शोध गटाने, मानवी केसा पेक्षा हजार पटींनी शुक्षम् असे पोली कॉटन असणारा जीवाणू प्रतिरोधी कापड शोधून काढले आहे.
डॉ. जैस्वाल आणि संपूर्ण टीम यांनी मोलीबडेनियम सल्फाईड , एमओएस२,यांचे वेगवेगळे थर वापरण्यात आले आहे. हे थर एखाद्या असंख्य छोट्या कैची सारखे काम करणार असून या थरातून ते कापून जीवाणू आणि विषाणूंना कापून ठार करणार आहेत. या अतिशुक्षम् चाकू असलेल्या कापडाला ६० वेळा पुन्हाधुवून वापरूनही ते जीवाणूंना ठार मारण्यात समर्थ होते हे त्यांचे आवर्जून सांगणे होते यामुळे या कपड्यांनी निर्मित मास्क पुन्हा वापरण्यायोग्य आहेत आणि पर्यावरण पूरक सुद्धा आहेत .
सूर्य प्रकाशाने मास्क होईल स्वच्छ:
वेगवेगळ्या चार रासायनिक प्रक्रिया केल्यागेल्या मुळे यातील रासायनिक घटक काही क्षण जरी सूर्य प्रकाशात काही वेळ राहिले तर गरम होते आणि त्यामुळे जीवाणूंचा नायनाट होतो. याचबरोबर मास्कमुळे वातावरणातील छोटे कनही मास्क परिधान करणाऱ्याच्या शरीरात प्रवेश करणार नाही असे ते म्हणाले. या शोधामुळे असंख्य वापरून फेकून देण्यात येणारे मास्क आणि पीपीई किट यांचा कचरा कमी होईल आणि फेकलेल्या या कचऱ्यापासून होणाऱ्या पर्यावरणाचे नुकसान पण टाळू शकतो.