मालिका विश्वात आपल्या स्मितहास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मानत स्थान मिळवले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘ खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील मयुरीने पहिल्यांदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले.तिने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यानंतर मयुरीने अभियनाच्या क्षेत्रात चांगले बस्तान बसवले.
मयुरी देशमुख या अभिनेत्री च्या पतीने म्हणजेच मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याची दुःखद बातमी समोर आली. या दोन्ही गोष्टीमुळे अनेकांना धक्का बसला होता. या घटनेमुळे काळाने मयुरीवर मोठा घात केला होता. त्यातून तिला सावरायला बराच वेळ लागला होता.
मयुरीने नंतर काही महिन्याने या दुःखातून सावरत ‘इमली” या हिंदी मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. त्यामुळे तिने दुःख मागे सारत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती.मयुरी म्हणाली, “आशुतोषच्या जाण्याचे दुःख माझ्यासाठी आभाळ कोसळण्यासारखेच होते. सर्वांनी मला यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे. त्याला त्याच्या भाच्चीवर खूप प्रेम होते आणि मुळात त्याला लहान मुले खूप आवडायची.”
दुसऱ्या लग्नाबाबत विचारल्यास मयुरी म्हणाली, “आशुतोषला मुले आवडत असल्याने मी १-२ लहान मुले दत्तक घेण्याचा विचार करीत आहे. मुले असतील तर दुसरे लग्न करण्याची काय आवश्यकता आहे. मी त्यांना घेऊन आनंदी राहू शकेल.” मयुरीचे हे उत्तर वाचून तिचे आशुतोषवर असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येते व या उत्तराने तिने अनेकांची मने जिंकली आहेत.’ माझे आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जवळ होता. त्या दोघांमध्ये खूप अटॅचमेंट होती. आशुतोषलाही लहान मुले खूप आवडायची… त्यामुळेच आता तो गेल्यानंतर मी मूल दत्तक घेण्याचा विचार करते आहे. अनेकदा मला दुसरे लग्न करण्याबाबत आडून आडून विचारले जाते, परंतु मुलांसाठी दुसरे लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?’ असा प्रश्न मयुरीने यावेळी विचारला. आशुतोष भाकरे यांच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून मयुरी सावरली असून आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघत ती जगत आहे.