अहमदाबाद आणि लखनऊ संघ कोणत्या नावाने आयपीएलमध्ये प्रवेश करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. लखनऊ संघाने नाव जाहीर करून ही प्रतीक्षा संपवली आहे. IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या या हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
यंदाच्या सिजन मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ सुद्धा असणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ संघ कोणत्या नावाने आयपीएलमध्ये प्रवेश करणार याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते मात्र लखनऊ संघाने आपले नाव जाहीर करून ही आतुरता पूर्णपणे संपवली आहे.यंदाच्या हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार असल्यामुळे हा सिजन खूप धमाकेदार होणार हे निश्चित. या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नविन संघ कश्या प्रकारे आपली खेळी खेळणार याकडे सगळयांच लक्ष असणार आहे.
लखनऊ संघाचं नाव जाहीर
यावर्षी होणाऱ्या IPL मध्ये लखनौचा संघ खास नाव घेऊन प्रवेश करणार आहे. याची अधिकृत घोषणा लखनऊ फ्रँचाईझीने केली आहे. आयपीएल २०२२ च्या हंगामात लखनऊ संघ ‘लखनऊ सुपर जायंट्स’ (Lucknow Super Giants) या नावाने उतरणार आहे. लखनऊ संघाची मालकी संजीव गोएंका (anjiv Goenka) यांच्याकडे आहे.
And here it is,
Our identity,
Our name…. 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3A— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
And here it is,
Our identity,
Our name…. 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3A— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
हे तीन खेळाडू असू असणार लखनऊ संघात
लखनऊ संघाने पहिल्या 3 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये के. एल राहुल याचा समावेश आहे वर्षीच्या हंगामात केल राहुल ने दमदार कामगिरी केली होती त्यामुळे लखनऊ। फ्रँचाईझीने बाजी मारत त्याला आपल्या संघात घेतलं आहे. के. एल राहुलसाठी अहमदाबाद आणि आरसीबी संघ देखील या स्पर्धेत होता. मात्र लखनऊ संघाने के एल राहुलला आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरला.
We wanted the best and we didn't settle for less. 💪🤩#TeamLucknow #IPL2022 @klrahul11 @MStoinis @bishnoi0056 pic.twitter.com/p9oM8M9tHy
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 21, 2022
के एल राहुल लखनऊ संघाचं नेतृत्व करण्याची शक्यत वर्तवण्यातआहे. मार्कस स्टोइनिस आणि रवि बिश्नोई हे आणखी दोन खेळाडूंना देखील लखनऊ संघामध्ये आहे. लखनऊच्या कर्णधारपदाचं नाव सध्या तरी निश्चित नसले तरी लवकरच कर्णीधार पदाचे घोषित केलं जाऊ शकते