IPL चा नवीन सिजन मार्च आणि एप्रिलमध्ये खेळला जाणार आहे . या 15 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू इथे सुरु आहे. या लिलावात एकूण 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे आणि त्यात 370 भारतीय तसेच 220 परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे.
आज लावलेल्या बोलीमध्ये भारताचा धडाकेबाज खेळाडू सुरैश रैना हा अनसोल्ड राहिला आहे. कोणत्याही टीमने रैनावर बोली लावली नाही . सुरेश रैनाची बेस प्राईज 2 करोड होती. यापूर्वी सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. सुरेश रैना ची कामगिरी यापूर्वी IPL चांगली होती मात्र गेल्या वर्षीच्या सिजन मध्ये त्याची कामगिरी पाहिजे इतकी खास राहीलेली नव्हती
सुरेश रैनाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 205 सामने खेळले आहे ज्यात रैनाने 32 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 39 अर्धशतकांचाही समावेश आहे. फलंदाजीसोबत रैना मधल्या गोलंदाजीही करू शकतो. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 25 विकेट्स आहेत.
त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि साऊथ आफ्रिकेचा हिटर डेव्हिड मिलर हे परदेशी खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. या दोन्ही खेळाडूंवर कोणीही बोली लावलेली नसून अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंचं नशीब कदाचित उद्या बदलण्याची शक्यता आहे.
यंदाच्या IPL सिजन मध्ये एकूण दहा संघ आहे. यामध्ये गुजरात आणि लखनऊ हे दोन नवीन संघ शामिल होणार असल्यामुळे हा सिजन खूप मजेशीर असण्याची शक्यता आहे.