आपल्या समाजात लैंगिक आरोग्याविषयी अजूनही खुलेपणाने बोललं जात नाही. बऱ्यात महिलांना याबद्दल बोलायला लाज वाटते. त्यामुळे कधीकधी सेक्स बद्दल मनात चुकीची धारणा निर्माण होते आणि आपली पार्टनर सोबतचे संबंध व्यवस्थित जुळत नाही. त्यामुळे लैंगिक आरोग्यबद्द बोलणं महत्वाचं आहे जेणेकरून चुकीचे माहिती न पसरता योग्य माहितीच्या आधारे आपले शारीरिक संबंध सुधारता येईल. आज आपण बघूया की सेक्स केल्यानंतर स्त्रियांना योनीमार्ग वेदना होणे ही सामान्य गोष्ट आहे का?
स्त्रियांमध्ये लैंगिक आरोग्य मासिक पाळी, गर्भधारणा आणि लैंगिक संबंधानंतर अनेक प्रकारे बदल होत असतात. काही महिलांना सेक्सनंतर योनीमार्गात वेदना होतात. सेक्सनंतर वेदना होणं हे सामान्य आहे , मात्र जर तुम्हाला एका दिवसापेक्षा जास्त काळ याचा त्रास होत असेल, तर हा एक वेगळा इशारा असू शकतो .
सेक्स करताना किंवा सेक्सनंतर वेदना होणं हे अतिशय सामान्य आहे. पण इतर काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या योनीमध्ये वेदना होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, अनेक महिलांना विविध कारणांमुळे सेक्स केल्यानंतर योनिमार्गात वेदना होऊ शकते. जाणून घेउया काही प्रमुख कारणे :
उत्पादनांची एलर्जी होणे :
कंडोम, लुब्रिकेंट किंवा इतर सेक्स संदर्भातील उत्पादनांचा वापरामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते. अशा गोष्टी योनिमार्गात जळजळ निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.
यीस्ट संसर्ग होणे :
जर तुम्हाला खाज सुटणं, जळजळ होणं, असामान्य स्त्राव आणि ओटीपोटात दुखणे यांसारखे त्रास होत असतील तर तुम्हाला योनीमार्गात संसर्ग निर्माण होऊ शकतो. हा एक फंगल इन्फेक्शन आहे ज्यामुळे सेक्सनंतर योनीमध्ये वेदना आणि जळजळ होऊ शकते.
लैंगिक संसर्ग होणे :
यीस्ट इन्फेक्शन व्यतिरिक्त, जर एखाद्याला क्लॅमिडीया, बॅक्टेरियल वेजिनोसिस, गोनोरिया यांसारखे STI असेल तर योनीमध्ये वेदना होतात. ही समस्या बरी होऊ शकते.
सेक्स किंवा लंगिक संसर्ग यासंदर्भात कुठलाही त्रास असल्यास आपल्या जवळच्या स्पेशालिस्ट डॉक्टर चा सल्ला घ्यावा सेक्स आणि त्याबद्दल चे शिक्षण असणे हे काळजी गरज असून याबद्दल संकोच नासायला पाहिजे.