कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरु केली.
बंगळुरु: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
( Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway)
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ शोध मोहीम सुरु केली आहे.
कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली.
फोन कोन केला याबाबत काही कळू शकलेले नाही. फोन कॉल आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.