एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भूल भुलैय्या-2 च्या शूटिंग दरम्यान कार्तिकला कोरोनाची लागण झाली होती. पण नंतर कार्तिकचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.कार्तिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. एक फोटो इन्स्टावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं की, त्यामुळे कोरोनाला देखील राहावलं नाही..असं म्हणत त्याने त्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
कर्तिक आर्यन त्याच्या भूल भुलैया २ या सिनेमामुळे सगळीकडं चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. दोन आठवड्यात या सिनेमानं १३७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
View this post on Instagram