सध्या ऑनलाईन फ्रॉड वाढत चाललेले आहे या ऑनलाइन फ्रॉडमुळे कधी कोणाचे पैसे बँक अकाउंट मधून डेबिट होतात तर कधी युजर्सच्या मोबाईल मधून वैयक्तिक माहिती गोळा केली जाते किंवा चोरली जाते परंतु हे सगळं अवैधरित्या केल्या जातं आणि हा एक प्रकारचा गुन्हा आहे ज्याला आपण सायबर गुन्हा असं म्हणतो. या सर्व गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे त्यासाठी काही आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला काही सेटिंग करावे लागतील. ज्यामुळे आपण या सायबर गुन्ह्यापासून स्वतःचा बचाव करू शकू. खरतर ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यापासून ते बँकेच्या कामांपर्यंत, शिक्षणापासून ते ऑफिसपर्यंत आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटवर अवलंबून राहावे लागते. पण, वाढत्या वापरामुळे युजर्ससाठी धोकाही वाढला आहे. इंटरनेटवर एखादे करण्यासाठी तुम्ही जेव्हा कोणत्याही वेबसाइटला भेट देता तेव्हा ती साइट तुमच्या वैयक्तिक डेटावर देखील लक्ष ठेवते. वेबसाइटला भेट दिली असता अनेकदा अनवधानाने युजर्स त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करतात.
संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर ब्राउझर वापरून युजर्स वेबसाइटला वैयक्तिक डेटा पाहण्यापासून ब्लॉक करू शकतात. यासाठी तुम्हाला डोन्ट ट्रॅक रिक्वेस्ट पाठवावी लागेल. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ते एनेबल करावे लागेल. या स्टेप्स फॉलो करून रिक्वेस्ट पाठवता येईल.
सर्वातप्रथम आपले, वेब ब्राउझर उघडा. आता थ्री पॉइंट पर्यायावर जा. तुम्हाला ते स्क्रीनच्या अगदी उजव्या बाजूला दिसेल. एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल. येथून सेटिंग्ज पर्याय निवडा. आता “गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज” पर्याय शोधा आणि “कुकीज आणि इतर साइट डेटा” वर क्लिक करा. तुम्ही तुमच्या ब्राउझिंग ट्रॅफिकसह “डो नॉट ट्रॅक” रिक्वेस्ट पाठवा सह ते चालू किंवा बंद करू शकता. सोबतच गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज” पर्याय शोधून Always use secure connections या पर्यायाला क्लिक करा. म्हणजे आपले नेट कनेक्शन नेहमी सुरक्षित राहील असा त्याचा अर्थ होतो.
फोनवर Google Chrome वेब ब्राउझर उघडा. स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करा. आता Settings पर्याय निवडा.
मेनू सूचीमधून “गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज” पर्याय शोधा आणि निवडा. आता “Do Not Track” पर्यायावर क्लिक करा आणि सेटिंग चालू करा.
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, डू नॉट ट्रॅक चालू केल्यानंतरही काही वेबसाइट तुमच्या वैयक्तिक डेटावर लक्ष ठेवू शकतात. गुगलच्या हेल्प सेंटर पेज नुसार, वेबसाइट सुरक्षितता सुधारण्यासाठी कन्टेन्ट, सेवा, जाहिराती आणि सूचना इत्यादी प्रदान करण्यासाठी तुमचा ब्राउझिंग डेटा वापरू शकतात. डू नॉट ट्रॅक विनंत्या प्राप्त होऊनही गुगलसह बर्याच वेबसाइट्स असे करणे सुरू ठेवू शकतात. त्यामुळे आता ह्या सगळ्या सेटिंग्स तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये अपडेट करू शकता आणि सायबर गुन्हे होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.